आशिष विद्यार्थी यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं, "मी खूप न्यूज चॅनल्समध्ये पाहिलं. मी आणि रुपाली रस्ता क्रॉस करताना आम्हाला बाईकने धडक दिली. आम्ही दोघे ठीक आहोत."
"रुपाली अंडर ऑब्जरवेशनमध्ये आहे. सगळं काही ठीक आहे. मी ठीक आहे. छोटीशी जखम झाली आहे. पण तीही बरी होईल. मी बोलतोय, चालतोय सगळं काही करू शकतोय. मला तुम्हाला फक्त हेच सांगायचं आहे की हो असं झालं आहे. पण आम्ही ठीक आहोत काळजी करण्याचं कारण नाही."
advertisement
आशिष विद्यार्थी पुढे म्हणाले, "मी पोलिसांना त्या दुचाकी स्वाराविषयीही विचारलं. त्यालाही आता शुद्ध आली आहे. सगळ्यांचं चांगलं होवो, सगळे ठीक राहोत. सगळ्यांचे आभार. हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून आम्ही ठीक आहोत हे सगळ्यांना कळेल. तुमचे शुभाशीर्वाद माझ्या आणि रुपालीच्या सोबत आहेत. आमचं कुटुंब आणि नातेवाईक आमच्यासोबत आहेत. अपोलो हॉस्पिटलचा इमरजन्स स्टॉफकडून आमची खूप चांगली काळजी घेतली जात आहे."
आशिष विद्यार्थी यांची पत्नी रुपाली या आसामच्या गुवाहटीमधील आहेत. ते पत्नीसह गुवाहटीमध्ये होते तेव्हा हा अपघात झाला. आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीला ज्या दुचाकीस्वाराने धडक दिली ते देखील जखमी झाला आहे. त्याला शुद्ध आली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आशिष यांच्या पायाला मार लागला आहे तर त्यांच्या पत्नीच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांच्या पत्नीचे दोन MIR करण्यात आले असून डॉक्टरांनी काळजीचं कारण नसल्याचं सांगितलं.
