विशाल निकमची सौंदर्या ही अभिनेत्री अक्षया हिंदळकर आहे. अक्षय आणि विशाल गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघे एकमेकांसाठी सोशल मीडियावर खूप प्रेमळ पोस्ट लिहायचे पण त्यात कुठेही त्यांनी त्यांच्या नात्याचा उल्लेख केला नव्हता.
( बायकोला डिवोर्स, शमिता शेट्टीसोबत ब्रेकअप; आजही लाखो तरुणी फिदा, राकेश बापटचं वय किती? )
विशाल निकम हा बिग बॉस मराठी 3 मध्ये सहभागी झाला होता. तो त्या सीझनचा विजेता ठरला होता. बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच विशालने अक्षयाचा उल्लेख सौंदर्या असा केला होता.त्यानंतर विशालची सौंदर्या नेमकी आहे कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.
advertisement
बिग बॉस मराठी 3 हा 2021मध्ये आला होता. त्यानंतर जवळपास 5 वर्षांनी विशालने त्याच्या सौंदर्याचं नाव आणि चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. 'माझी अर्ध्यांगिनी' असं म्हणत विशालने दोघांचा सिमेमॅटिक व्हिडीओ शेअर केला आहे. दोघांचा रोमँटिक अंदाज यात पाहायला मिळतोय.
विशाल आणि अक्षया यांनी 2019 साली स्टार प्रवाहवरील 'साता जन्माच्या गाठी' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. मालिकेत दोघे एकमेकांचे प्रेयसी आणि प्रियकर दाखवले होते. अपघाताने तिचे लग्न विशालच्या भावाशी होतं. ही मालिका तेव्हा खूप हिट झाली होती. प्रेक्षकांनी मालिकेला खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. विशाल आणि अक्षया या मालिकेमुळे घराघरात पोहोचले.
विशाल आणि अक्षयाने शेअर केलेला व्हिडीओ पाहून चाहत्यांनाा साता जन्माच्या गाठी या मालिकेची आठवण झाली आहे. मालिकेच्या टायटल साँगमध्येही सेम सीन्स दाखवण्यात आले होते. साता जन्माच्या गाठी या मालिकेच्या लोकेशनवरच दोघांनी हा व्हिडीओ शूट केला असावा असा अंदाज आहे. विशाल आणि अक्षया हिंदळकर लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे
