मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा कलाकारांना देखील याचा फटका बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी व्हिडीओ शेअर करत त्यांना झालेला त्रास सांगितला आहे. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
( हेही वाचा - मेगाब्लॉकमुळे घरीच आहात? मग OTTवर करा टाइमपास, पाहा या 5 फिल्म्स आणि वेब सीरिज )
advertisement
अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या गाडीतून व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्या सांगतायत, माझं शुटींग मढला असतं. मी ठाण्याहून सकाळी 8 वाजता निघालेये आणि आता 12.30 झालेत तरीही मी मढला पोहोचले नाहीये. पाच तास झालेत. घोडबंदर रोज पूर्णपणे जाम आहे. एका जागी एक एक तास गाड्या थांबवून ठेवत आहेत. मुलूंड ऐरोली ब्रिजच्या इथेही कुठेतरी कंटेनर पलटी झाल्यानं तिथेही ट्रॅफिक आहे. त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काही काम नसेल तर प्लिज घराबाहेर पडू नका कारण खाण्या पिण्याचे खूप हाल होत आहेत.
सुप्रिया पाठारे पुढे म्हणाल्या, महत्त्वाची गोष्ट नाटक वाल्यांसाठी ज्याच्या नाटकाचे प्रयोग असतील तर त्यांनी प्लिज वेळेत निघा कारण सगळीकडून खूप ट्रॅफिक आहे. कोणी कुठेही अडकू नये यासाठी काळजी घ्या.
अभिनेत्री सुप्रिया पाठारे सध्या स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत काम करत आहेत. मालिकेत त्यांनी सासूची भुमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे नुकताच त्यांचा नाच गं घुमा हा सिनेमा देखील रिलीज झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.