TRENDING:

The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री, 4-5 नाही तर 16 सीन्सवर केले मोठे बदल

Last Updated:

सर्वच स्तरावर 'द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्ड' चित्रपटावर टीका होत असताना आता सेंट्रल बोर्डाने सर्टिफिकेट देत प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कामख्या नारायण सिंग दिग्दर्शित 'द केरला स्टोरी 2 गोज बियाँड' (The Kerala Story 2: Goes Beyond) चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. येत्या 27 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण देशभरामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. केरळाचे मुख्यमंत्र्यांसह अनेक सेलिब्रिटी सुद्धा या चित्रपटावर टीका करीत आहेत. सर्वत्र टीका होत असताना आता सेंट्रल बोर्डाने चित्रपटाला सर्टिफिकेट देत हिरवा कंदील दाखवला आहे.
after 16 revisions and cuts the keral story 2 goes beyond gets censor certificate from CBFC
after 16 revisions and cuts the keral story 2 goes beyond gets censor certificate from CBFC
advertisement

कोणतं सर्टिफिकेट मिळालं?

सर्वच स्तरातून टीकेचे धनी झालेल्या या चित्रपटाला सीबीएफसीने U/A 16+ सर्टिफिकेट दिलेले आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहता चित्रपटाला A म्हणजेच 18 वर्षांवरील लोकांनाच चित्रपट पाहायला मिळेल अशी शक्यता होती. परंतु सीबीएफसीने U/A 16+ सर्टिफिकेट देत 16 वर्षांपुढील सर्व प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. सीबीएफसीने निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना चित्रपटामध्ये 16 बदल सुचवले होते. लिप लॉक आणि महिलांवरील अत्याचाराच्या सीन्सवर सेंट्रल बोर्डाने कात्री चालवली आहे. यामुळे हा चित्रपट 16 वर्षांवरील प्रेक्षकांना पाहण्यासाठी मंजुरी देण्यात आली.

advertisement

महिलांना कानाखाली मारून डोक्यावर मारल्याचे दाखवणारे दोन वेगवेगळे सीन्स, आरोपीच्या घराची बुलडोझरने तोडफोड केल्याचे दाखवणाऱ्या सीनमध्येही सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकांना बदल करण्याचे आदेश दिले आहेत. चित्रपटात तीन वेगवेगळ्या ठिकाणी संवाद बदलण्यात आले आहेत आणि एक आक्षेपार्ह शब्द पूर्णपणे म्यूट करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा सत्य घटनांवर आधारित आहे असे सांगणारा डिस्क्लेमर चित्रपटात जोडण्याचे निर्देश बोर्डाने दिले आहेत. चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, या दाव्याला समर्थन देण्यासाठी सेंट्रल बोर्डाने निर्मात्यांकडून आणि दिग्दर्शकांकडून ठोस कागदपत्रांची मागणी केली होती. बोर्डाने अल्पवयीन कलाकारांच्या कास्टिंगबाबत निर्मात्यांकडून संमती पत्र देखील मागितले. 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ग्रामीण भागातील पारंपरिक पदार्थ, सोप्या पद्धतीने बनवा गोड सांदणे, रेसिपीचा Video
सर्व पहा

निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी चित्रपटामध्ये सांगितलेले बदल केल्यानंतरच सेंट्रल बोर्डाने चित्रपटाला सर्टिफिकेट दिलं आहे. त्यानंतरच चित्रपटाचा 131 मिनिटांचा एकूण रनटाईम असणार आहे, असे ठरवण्यात आले. अर्थात 2 तास 11 मिनिटे आणि 24 सेकंदाचा संपूर्ण चित्रपटाचा रनटाईम असेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री, 4-5 नाही तर 16 सीन्सवर केले मोठे बदल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल