'दीपज्योती' या मालिकेत दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या कुटुंबाची गोष्ट सांगितली जाणार आहे. एकीकडे एक सर्वसामान्य कुटुंब आहे, जिथे दोन बहिणी आपला मोठा भाऊ अभिजीतसोबत राहत आहेत. वडील दारूच्या आहारी गेल्याने भावाच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली आहे. मात्र, घरात हालाखीची परिस्थिती असतानाही या भावा-बहिणींमध्ये खूप प्रेम आहे. भावाला हातभार लावण्यासाठी ज्योतीला शिकून मोठं व्हायचं आहे.
advertisement
दोन कुटुंबांच्या दोन गोष्टी वेगवेगळ्या कहाण्या
दुसरीकडे पुरुषोत्तम यांचं कुटुंब घरंदाज आणि श्रीमंत असून त्यांना स्वराज, दीप आणि विराज ही तीन मुलं आहेत. तिन्ही मुलांपैकी मधला मुलगा दीप याच्यावर पुरुषोत्तम यांचा राग आहे. दीप लहान असताना त्याच्या आईचं निधन झालं. या घटनेसाठी पुरुषोत्तम दीपलाच जबाबदार मानतात. तेव्हापासून ते त्याचा तिरस्कार करतात. आईशिवाय वाढलेला दीप मोठेपणी दारूच्या आहारी जातो.
9.2 रेटिंगची सीरिज ठरली OTT ची बादशाह! 5 वर्षांपासून कायम आहे दबदबा, तिसरं सीझन पाहून ढसाढसा रडाल
एका 'धक्क्याने' बदलणार दोन आयुष्य!
प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार, दीप एका दारूच्या दुकानातून दारू घेऊन पितो. तिथे त्याचा भाऊ त्याला घ्यायला येतो. पण दीप त्याची गाडी घेऊन निघून जातो. दारूच्या नशेत तो अभिजीतच्या रिक्षाला धडकतो. या धडकेत अभिजीत आणि त्याच्या बहिणीचा होणारा पती मृत्यूमुखी पडतो. त्यानंतर दोन्ही बहिणी आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित करतात. ज्योती भावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते. तर तिची बहीण आपल्या होणाऱ्या पतीच्या मृत्यूचा सूड घेण्याचा निर्धार करते.
१३ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वाजता ही मालिका झी मराठीवर प्रसारित होणार आहे. मालिकेचं अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी यांनी केलं असून संवाद इरफान मुजावर यांनी लिहिले आहेत आणि मालिकेचं दिग्दर्शन अमित सावर्डेकर यांनी केलं आहे. मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते की नाही हे येणारा काळच सांगेल.
