थायलंडच्या बीचवर जान्हवीचा जलवा
जान्हवी किल्लेकर कामाच्या निमित्ताने थायलंडला गेली असली तरी, कामासोबत ती तिथल्या सुंदर किनाऱ्याचा पुरेपूर अनुभव घेत आहे. जान्हवीने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती निळ्या रंगाच्या बीचवेअर सूटमध्ये दिसत आहे. बोटीतून किनाऱ्यावर फिरताना ती खास पोझ देताना दिसत आहे.
या व्हिडिओला तिने एकदम कूल कॅप्शन दिले आहे, "Thai tides & good vibes". तिच्या या लुकवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत आणि तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.
advertisement
मराठीतील फेव्हरेट खलनायिका
जान्हवी किल्लेकर मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत, पण प्रेक्षकांनी तिला खलनायिकेच्या भूमिकेत जास्त पसंत केले आहे. 'जय जय स्वामी समर्थ', 'आई माझी काळुबाई', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' आणि 'भाग्य दिले तू मला' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये ती दिसली आहे.
'बिग बॉस मराठी ५' मध्ये सहभागी झाल्यानंतर जान्हवीला अधिक प्रसिद्धी मिळाली आणि तिचे फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणात वाढले. नुकतंच जान्हवीने सुरजचं लग्न गाजवलं होतं. तिने सुरजच्या लग्नात हिरिरीने सहभाग घेत सर्व विधी उत्साहात पार पाडल्या होत्या. अतिश्रमामुळे तिला काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत स्वतः जान्हवीने माहिती दिली होती. अशातच आता जान्हवी पूर्णपणे बरी झाली असून ती थायलंडच्या बीचवर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
