लोक आता पुन्हा त्याच्याबद्दल जाणून घ्यायला लागले आहेत. हा कलाकार इतका वेगळा कसा? इतरांसारखी धडाधड प्रमोशन्स नाहीत, सततचा गाजावाजा नाह, फक्त स्क्रीनवर दिसताना त्याचा प्रभाव मात्र जबरदस्त आणि जेव्हा लोक त्याच्याबद्दल शोधू लागतात, तेव्हा एक किस्सा पुन्हा पुन्हा समोर येतो. ‘दिल चाहता है’च्या सेटवरचा, आजही बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड आणि अविस्मरणीय किस्सा.
advertisement
2001 साली आलेल्या ‘दिल चाहता है’मध्ये तीन मित्रांपैकी सर्वात शांत, संवेदनशील आणि मॅच्युअर अशी ‘सिड’ची भूमिका अक्षय खन्नाने साकारली होती. हा कॅरेक्टर जितका सोपा वाटतो, तितकाच खोल होता. वयाने तरुण पण खुपच पुढचा विचार करणारा असा सिड प्रेक्षकांच्या मनात आजही बसलेला आहे. पण या सिडचा लुक कसा तयार झाला, यामागची कथा फार कमी लोकांना ठाऊक आहे आणि तीच आजही इंडस्ट्रीत गाजलेली.
हा फरहान अख्तरचा डायरेक्टरचा पहिला सिनेमा होता, या सिनेमातील व्यक्तीमत्वाच्या लूक्सबद्दल खूप डिप विचार केला गेला होता. शूटिंगला सुरुवात होण्याच्या एक-दोन दिवस आधी फरहान अख्तर आणि अक्षय खन्ना ‘सिड’ कसा दिसावा यावर चर्चा करत होते. अक्षयने फक्त एवढंच सांगितलं होतं की “हा मुलगा बाकी दोघांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक शांतपणा आहे, एक प्रगल्भता आहे.” पण त्या वेगळेपणाचं स्वरूप नेमकं काय? याचं स्पष्टीकरण त्याने दिलं नव्हतं. त्याच्या लूकवर चर्चा सुरु होती.
दुसऱ्याच दिवशी अक्षय जेव्हा सेटवर पोहोचला, तेव्हा संपूर्ण युनिट काही क्षण थिजूनच गेलं. कारण त्याने डोक्यावर झीरो कट मारला होता. त्या काळात एका मोठ्या हिरोने अशा पद्धतीने पूर्ण टक्कल करणं म्हणजे फार मोठी रिस्क. दिग्दर्शक फरहान अख्तर तर क्षणभर विचारात पडला. रोलच एकदम बदलून जाईल का? सिड असा दिसावा का?
पण अक्षय फक्त शांतपणे म्हणाला, “सिडचं जग वेगळं आहे. तो आपल्या वयाच्या मुलांसारखा नाही. त्याच्या लुकमध्येही ते दिसायला हवं.” त्या आत्मविश्वासात इतकी ताकद होती की टीमने त्याचा निर्णय स्वीकारला आणि पुढचाच प्रवास इतिहास ठरला. मुंडण केलेला तो शांत, स्थिर, विचारशील ‘सिड’ आजही हिंदी सिनेमातील आयकॉनिक लुक म्हणून ओळखला जातो आणि मनोरंजक म्हणजे, तो लुक दिग्दर्शकाने नव्हे, तर स्वत: अक्षय खन्नाने ठरवला होता.
आज ‘धुरंधर’पासून त्याच्या नव्या कामांपर्यंत अक्षय खन्नाचा स्क्रीनवरील वजनदारपणा पुन्हा जाणवतो आहे. प्रेक्षक त्याच्यावर प्रेम करायला लागले आहेत आणि त्याच्याबद्दल नवे जुन्या आठवणींमध्ये रमू लागले आहेत. कधी कधी शांत राहणारे कलाकारच सर्वात खोल ठसा उमटवतात हे अक्षय खन्ना पुन्हा एकदा सिद्ध करतोय. तो गाजावाजा करत नाही, पण त्याचा अभिनय मात्र प्रत्येक वेळी आपल्याला थांबवून पाहायला भाग पाडतो आणि कदाचित म्हणूनच त्याच्याबद्दलचे असे किस्से आजही लोक तितक्याच उत्सुकतेने ऐकतात.
