TRENDING:

'अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला कधी सून मानलं नाही' जया बच्चनने केला खुलासा!

Last Updated:

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिच्या आणि बच्चन कुटुंबियांमध्ये काही अलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार असल्याचं समोर येतंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिच्या आणि बच्चन कुटुंबियांमध्ये काही अलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार असल्याचं समोर येतंय. या सगळ्या चर्चांमध्ये जया बच्चन, अभिषेक बच्चन यांच्या जुन्या मुलाखतीतील स्टेटमेंट व्हायरल होत आहेत. आता आणखी एक स्टेटमेंट चर्चेचा विषय ठरतंय. अमिताभ बच्चनने ऐश्वर्याला कधी सून मानलं नाही, असं जया बच्चन म्हटल्या होत्या.
अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला कधी सून मानलं नाही
अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला कधी सून मानलं नाही
advertisement

जया बच्चन यांची करण जौहर टॉक शो कॉफी विथ करणमधील एक मुलाखत व्हायरल होतीय. यामध्ये जया यांनी म्हटलं होतं की, अमिताभ बच्चन ऐश्वर्याला सून माननत नाही. हे स्टेटंमेंट सोशल मीडियावर वाऱ्यासारखं फिरत आहे. नेटकरी यावर अनेक प्रतिक्रियाही देत आहेत.

एकेकाळी 500 रुपये कमावणं कठीण अन् आज एका एपिसोडसाठी 25 लाख घेतो 'हा' अभिनेता; किती आहे संपत्ती?

advertisement

व्हायरल होत असलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये जया बच्चन बोलत आहेत, अमित यांच्या आयुष्यात एक पोकळी होती मात्र ती खंत ऐश्वर्यानं भरुन काढली. अमित जी जेव्हा ऐश्वर्याला पाहतात तेव्हा आनंदी होतात. त्यांनी कधी तिला सून मानलं नाही. नेहमीच त्यांनी ऐश्वर्याला आपली मुलगी मानलं आहे. श्वेताचं लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. तिच्या जाण्यनं जी कमी अमितजींना जाणवत होती ती ऐश्वर्यानं भरुन काढली.

advertisement

दरम्यान, जया यांनी या मुलाखतीत ऐश्वर्याचं कौतुकही केलं होतं. त्यांनी ऐश्वर्याला एक चांगली आई आणि स्ट्रॉंग महिलाही म्हटलं. दरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जातंय. अद्याप यावर दोघांनीही मौन बाळगलंय. त्यामुळे खरंच दोघं घटस्फोट घेणार आहे की फक्त या अफवाच आहेत हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला कधी सून मानलं नाही' जया बच्चनने केला खुलासा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल