अंकिताच्या घरी नेमकं कोणाचं नवीन पाऊल पडलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ती कोणी व्यक्ती नाही तर अंकिताची नवी कार आहे. अंकिता आणि कुणाल यांनी नुकतीच नवी कार खरेदी केली. अंकिताने काही दिवसांआधी तिच्या जुन्या कारचा व्हिडीओ शेअर केला होता. ती कार तिने विकली आणि ओनर कार घेऊन गेला. त्यानंतर अंकिताने थेट तिच्या नव्या कारचा फोटो शेअर केला आहे.
advertisement
( BBM 6 : अनुश्रीला 'भाऊचा धक्का'! प्राजक्तावर दादागिरी महागात; रितेश भाऊने दिला दणका )
अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आज आमच्या आयुष्यात एक नवीन पाऊल पडलं. दुसरी कार घेतली. या दोन्ही कार म्हणजे आमच्या मेहनतीचं आणि प्रगतीचं प्रतीक आहेत. माझ्या आणि कुणालच्या बिझनेस ग्रोथमध्ये या आमच्या लक्ष्मी म्हणून कायम सोबत राहतील. कृतज्ञता, मेहनत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा प्रवास अजून पुढे जाऊ दे."
अंकिता आणि कुणाल यांनी सुझूकी कंपनीची कार खरेदी केली आहे. दोघांच्या घरी आलेल्या नव्या पाहुणीचं चाहत्यांनी देखील स्वागत केलं आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी अंकिताचं अभिनंदन केलं असून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकिताने तिच्या लग्नाच्या काही दिवस आधीच नवीकोरी ऑडी कार खरेदी केली होती. ती कार तिने लग्नासाठी गावी नेली आणि समारंभाहून परत येत असताना त्या कारचा अपघात झाला होता. कारचा आरसा आणि काही भाग डॅमेज झाला होता. अंकिताने व्हिडीओ शेअर करत संपूर्ण घटना शेअर केली होती. लग्नाच्या काही वर्षात अंकिता आणि कुणाल यांनी पुन्हा एकदा नवी कार खरेदी केली आहे.
