TRENDING:

दुसऱ्या लग्नात बेभान होऊन नाचली अपूर्वा नेमळेकर, पूर्वा शिंदेसोबत धरला ठेका, नवरा बघतच राहिला; VIDEO

Last Updated:

Apurva Nemlekar Wedding: १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर अपूर्वाने अनुज गोवळकर याच्याशी लग्नगाठ बांधली आणि नव्या संसाराला सुरुवात केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी टेलिव्हिजनची 'शेवंता' म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर अपूर्वाने अनुज गोवळकर याच्याशी लग्नगाठ बांधली आणि नव्या संसाराला सुरुवात केली. हे लग्न अगदी दणक्यात साजरं झालंय. सोशल मीडियावर सध्या अपूर्वाच्या लग्नातील डान्सचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये नवरीबाईने आपल्या डान्सने सर्वांना थक्क केलं आहे.
News18
News18
advertisement

'शरारत' गाण्यावर रंगली जुगलबंदी

अपूर्वाच्या लग्नाला तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. यामध्ये तिची खास मैत्रीण आणि अभिनेत्री पूर्वा शिंदे ही सुद्धा उपस्थित होती. लग्नाच्या धामधुमीत या दोन मैत्रिणींनी असा काही डान्स केला की तिथे उपस्थित असलेल्यांच्या नजरा त्यांच्यावरून हटल्या नाहीत. रणवीर सिंगच्या 'धुरंधर' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'शरारत' या गाण्यावर अपूर्वा आणि पूर्वाने जबरदस्त ठेका धरला.

advertisement

प्रेमाचं अंकुर फुलण्याआधीच कोमेजलं! करण घराबाहेर होताच प्राजक्ता कोसळली, बाल्कनीत एकटीच बसून ढसाढसा रडली, PHOTO

खास पारंपरिक नऊवारी साडी, अंगावर दागिने आणि चेहऱ्यावर लग्नाचा आनंद अशा रूपात जेव्हा अपूर्वा थिरकली, तेव्हा मांडवात एकच जल्लोष झाला. पूर्वाने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून, "माझ्या मैत्रिणीचं लग्न!" असं कॅप्शन देत आपला आनंद व्यक्त केला आहे.

advertisement

घटस्फोटाचं दुःख मागे सारून नवी सुरुवात

अपूर्वाने २०१४ मध्ये रोहन देशपांडेसोबत प्रेमविवाह केला होता, मात्र काही वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून अपूर्वा आपलं संपूर्ण लक्ष करिअरवर केंद्रित करत होती. 'आभास हा' या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र, 'रात्रीस खेळ चाले' मधील 'शेवंता' या पात्राने तिला घराघरात पोहोचवलं. यानंतर अपूर्वाचा आलेख चढताच राहिला आहे. अनेक वर्ष सिंगल राहिल्यानंतर, योग्य जोडीदाराची वाट पाहून तिने आता अनुजच्या रूपाने आपला मिस्टर परफेक्ट निवडला आहे.

advertisement

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आता हार्वेस्टरचे व्हा मालक! शेतकऱ्यांना 35 लाखांचे मिळतंय अनुदान,कुठे कराल अर्ज?
सर्व पहा

अपूर्वा आणि अनुज यांनी हे लग्न अत्यंत खासगी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मोजकेच नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून अपूर्वाच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला आहे. पहिल्या लग्नातील कटू आठवणींनंतर आता ती पुन्हा एकदा आयुष्याची नवी सुरूवात करत असल्याने चाहत्यांनी तिच्या संसारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
दुसऱ्या लग्नात बेभान होऊन नाचली अपूर्वा नेमळेकर, पूर्वा शिंदेसोबत धरला ठेका, नवरा बघतच राहिला; VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल