सोशल मीडियापासून दूर
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए.आर.रहमान 'रामायण' चित्रपटाला संगीत देणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये चित्रपटाचा म्युझिक लाँचिंग इव्हेंट पार पडणार आहे. त्यासाठी आता गायक ए.आर.रहमान याने लवकरात लवकर चित्रपटाशी निगडीत काम संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 40 दिवसांसाठी ए.आर.रहमान आता सोशल मिडिया आणि इंटरनेट पासून दूर राहणार आहे. त्यामुळे तो त्याचा संपूर्ण फोकस आपल्या कामावर करू शकणार आहे. याबद्दलची माहिती ए.आर.रहमानने चेन्नईमध्ये झालेल्या कार्यक्रमातून चाहत्यांना दिली आहे. यामुळे ए.आर.रहमानला चाहत्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. पण असं असलं तरीही अनेकांनी या गोष्टीमुळे नाराजीही व्यक्त केली आहे.
advertisement
बॉलिवूड हंगामाला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या मार्च महिन्यामध्ये 'रामायण' चित्रपटसंबंधित एक इव्हेंट होणार आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून चित्रपटातील कलाकारांची आणि टेक्निशियनची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे ए.आर.रहमान त्या कार्यक्रमाआधीच आपलं संपूर्ण काम आटोपण्याच्या तयारीत असणार आहे. दरम्यान, त्या कार्यक्रमाचे अद्याप अधिकृत रित्या घोषणा करण्यात आलेली नाही. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, राघव जुयाल, सनी देओल, रवि दुबे, अरूण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग सह अनेक सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट दोन भागांमध्ये विभाजित करण्यात आला असून चित्रपटाचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीमध्ये तर दुसरा भाग 2027 च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे.
