राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मंगळवारी तब्बल 25 हजार क्विंटल तूरीची आवक झाली. तर तूरीला सरासरी 7429 चा दर मिळाला. तूरीची सर्वाधिक 7992 क्विंटल आवक अमरावती बाजार समितीत झाली. तूरीला सर्वाधिक 8700 रूपयांचा दर दुधणी बाजार समितीत मिळाला.
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे! उन्हाचा पारा वाढणार; हवामान खात्याचा अलर्ट
advertisement
राज्यात मंगळवारी 11 हजार 712 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सोयाबीनला सरासरी 5146 रू प्रती क्विंटल भाव मिळाला. सोयाबीनची सर्वाधिक 2100 क्विंटल आवक वाशिम बाजार समितीत झाली. तर सोयाबीनला सर्वात जास्त दर 5990 रूपयांचा दर मंगरूळपीर बाजार समितीत मिळाला.
राज्यात कांद्याची 2 लाख 30 हजार 111 क्विंटल आवक झाली. कांद्याला 1192 रूपये प्रती क्विंटल इतका सरासरी दर मिळाला. सर्वाधिक आवक सोलापूर बाजार समितीत 37554 क्विंटल एव्हढी झाली. तर 2520 रूपये एव्हढा दर कामठी बाजार समितीत मिळाला.
राज्यातील सर्वाधिक कापसाची आवक 9200 क्विंटल हिंगणघाट बाजार समितीत झाली. तर राज्यातील सर्वाधिक 7945 रूपये दर हिंगणा या बाजार समितीत मिळाला. कापसाचे दर हमीभावापेक्षाही कमी झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा आहे.





