advertisement

Success Story : द्राक्ष शेतीचा घेतला धाडसी निर्णय, मराठवाड्यातील शेतकऱ्याचं नशीब पालटलं, 30 लाख नफा!

Last Updated:

विलास टेकाळे यांनी साली तीन एकरची द्राक्षबाग फुलवली असून या माध्यमातून त्यांना 30 ते 40 लाखांचं निव्वळ उत्पादन होणार आहे.

+
टेकाळे

टेकाळे

जालना: कोरोना आणि त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. अक्षरशः 15 ते 20 रुपये प्रति किलोने देखील द्राक्ष कोणी घ्यायला तयार नव्हतं. परंतु अशाही परिस्थितीत खचून न जाता द्राक्षबाग जगवलेल्या शेतकऱ्यांना आता अच्छे दिन आले आहेत. जालन्यातील नंदापूर येथील विलास टेकाळे यांनी साली तीन एकरची द्राक्षबाग फुलवली असून या माध्यमातून त्यांना 30 ते 40 लाखांचं निव्वळ उत्पादन होणार आहे. पाहुयात कसं केलं टेकाळे यांनी द्राक्ष बागेचे नियोजन.
नंदापूर येथील विलास टेकाळे मागील आठ ते दहा वर्षांपासून द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत. कोरोना काळामध्ये त्यांचं प्रचंड नुकसान झालं. परंतु अडचणीच्या प्रसंगी त्यांनी हार न मानता द्राक्षबाग जगवली. सध्या त्यांच्याकडे सुपर सोनाका, SSN आणि ब्लॅक ज्योती अशा तीन व्हरायटी आहेत. या द्राक्ष बागेसाठी त्यांना 10 लाख खर्च आला आहे.
advertisement
ब्लॅक ज्योती या वाणाला 160 ते 171 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. सुपर सोनाका आणि SSN या वाणाला 90 ते 100 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर भविष्यात वाढण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे तीन एकरच्या द्राक्ष बागेतून 35 ते 40 लाख रुपयांचे उत्पन्न होणार आहे. यातून खर्च वजा केल्यास 30 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा टेकाळे यांनी लोकलशी बोलताना व्यक्त केली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : द्राक्ष शेतीचा घेतला धाडसी निर्णय, मराठवाड्यातील शेतकऱ्याचं नशीब पालटलं, 30 लाख नफा!
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement