advertisement

माय-लेकींनी सुरू केलं ‘करी पत्ता किचन’, पुणेकरांना स्वस्तात मिळतंय पोटभर जेवन, पाहा लोकेशन, Video

Last Updated:

Pune Food: जवळच असलेल्या महाविद्यालयांमुळे अनेक विद्यार्थी येथे नियमित जेवायला येतात. स्वच्छ, ताजं आणि कमी पैशात घरचं जेवण मिळावं, हीच या उपक्रमामागची संकल्पना होती,

+
माय-लेकींनी

माय-लेकींनी सुरू केलं ‘करी पत्ता किचन’, पुणेकरांना स्वस्तात मिळतंय पोटभर जेवन, पाहा लोकेशन, Video

पुणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात शिक्षण आणि नोकरीसाठी घराबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अशा विद्यार्थ्यांना स्वच्छ, घरगुती आणि परवडणारे जेवण मिळावे, या उद्देशाने पुण्यातील कर्वेनगर भागात मायलेकीच्या जोडीने ‘करी पत्ता किचन’ सुरू केलंय. विद्या शेनमारे आणि भूमिका शेनमारे अशी या मायलेकींचं नाव असून त्यांचा हा पोळी-भाजीचा व्यवसाय अनेकांची भूक भागवत आहे.
मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून पुण्यात आलेल्या विद्या शेनमारे यांनी सुरुवातीला परिसरातील विद्यार्थ्यांसाठी घरातून डबे देण्यास सुरुवात केली. कॉलेजला जाणाऱ्या मुलांनीच त्यांना एक छोटा स्टॉल उभारण्याची कल्पना दिली. मुलीच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनामुळे त्यांनी घरापुरता मर्यादित व्यवसाय न ठेवता तो अधिक व्यापक स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच प्रयत्नातून ‘करी पत्ता किचन’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.
advertisement
व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात अवघ्या 10 रुपयांपासून भाजी आणि 6 रुपयांपासून चपाती देत विद्यार्थ्यांना परवडणारे जेवण दिले जात होते. आज त्यांच्या किचनमध्ये 60, 70 रुपयांमध्ये संपूर्ण थाळी उपलब्ध आहे. 70 रुपयांच्या व्हेज थाळीत तीन चपाती, डाळ-भात आणि दोन भाज्या दिल्या जातात, तर 60 रुपयांच्या मिनी थाळीत दोन चपाती, एक भाजी आणि डाळ-भात असतो. रोजच्या मेनूमध्ये चार प्रकारच्या भाज्या, भात, चपाती, मेथी पराठा, आलू पराठा असे पदार्थ असतात. हे सर्व जेवण विद्या शेनमारे स्वतः बनवतात.
advertisement
जवळच असलेल्या महाविद्यालयांमुळे अनेक विद्यार्थी येथे नियमित जेवायला येतात. स्वच्छ, ताजं आणि कमी पैशात घरचं जेवण मिळावं, हीच या उपक्रमामागची संकल्पना होती, असं विद्या शेनमारे सांगतात. आज त्यांच्या किचनमधून दररोज किमान 100 ते 150 थाळी वितरित केल्या जातात. विशेष म्हणजे, जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थी “तुमचं जेवण खाल्लं की घरची आठवण येते,” अशी भावना व्यक्त करतात.
advertisement
आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि स्वतःच्या आत्मनिर्भरतेसाठी सुरू केलेला हा व्यवसाय आज अनेक विद्यार्थ्यांसाठी घरचं जेवण देणारा ठरला आहे. मायलेकींच्या मेहनत, चिकाटी आणि सेवाभावातून उभा राहिलेला ‘करी पत्ता किचन’ हा छोटा व्यवसाय मोठी प्रेरणा देणारा आहे.
view comments
मराठी बातम्या/Food/
माय-लेकींनी सुरू केलं ‘करी पत्ता किचन’, पुणेकरांना स्वस्तात मिळतंय पोटभर जेवन, पाहा लोकेशन, Video
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement