advertisement

गृहिणींनो, रिस्क का घेताय? तुमची जेवणाची ‘ही’ चूक आरोग्याला धोका, काहीही होऊ शकतं, Video

Last Updated:

Health Tips in Marathi: शिळं अन्न हे शरीरासाठी 'स्लो पॉयझिनिंग' ठरू शकतं. नुसत्या वासावरून अन्न चांगले आहे की खराब हे ओळखणे चुकीचे आहे.

+
गृहिणींनो,

गृहिणींनो, रिस्क का घेताय? तुमची जेवणाची ‘ही’ चूक आरोग्याला धोका, काहीही होऊ शकतं, Video

छत्रपती संभाजीनगर : घरातील सगळ्यांची भूक भागवताना अनेक गृहिणी स्वतःच्या ताटात मात्र उरलेलेच अन्न घेतात. ‘अन्नाची नासाडी नको’ किंवा बचतीची सवय यामुळे कालचा भात, भाजी किंवा पोळ्या दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याची पद्धत अनेक घरांत दिसते. पण हीच सवय आरोग्यासाठी धोक्याची ठरू शकते. वारंवार शिळे अन्न खाल्ल्याने शरीरावर हळूहळू विपरीत परिणाम होऊ शकतो, शिळं अन्न हे शरीरासाठी 'स्लो पॉयझिनिंग' ठरू शकतं, असा इशारा आहार तज्ज्ञ डॉ. शिवाजी जाधव यांनी दिला आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात वेळ वाचविण्यासाठी किंवा रात्री उरलेले अन्न फेकून देणे जिवावर येते म्हणून ते फ्रिजमध्ये ठेवले जाते. फ्रिजमध्ये अन्न ठेवल्याने ते सुरक्षित राहते, हा एक मोठा गैरसमज आहे. फ्रिजमधील अन्नाचे पोषक घटक कालांतराने कमी होतात. शिवाय उष्ण आणि दमट वातावरणात अन्नामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात. नुसत्या वासावरून अन्न चांगले आहे की खराब हे ओळखणे चुकीचे आहे. शिळ्या अन्नावर बुरशीजन्य घटक तयार होतात.
advertisement
शिळं अन्न खाल्ल्याने आरोग्याला मोठे धोके
शिळं अन्न खाल्ल्याने अन्नातील हानिकारक बॅक्टेरियामुळे उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखी होऊ शकते. तसेच काही ॲलर्जीच्या प्रकारांना देखील सामोरं जावं लागू शकतं. अन्नामुळे पोटाचे विकार आणि ॲसिडिटी वाढते हे लक्षात घ्यायला पाहिजे. शिळे, उघडे अन्न खाल्ल्यास विषबाधा देखील होऊ शकते.
advertisement
रात्रीची पोळी-भाजी खाऊ नका
महिलांना रात्रीची पोळी-भाजी किंवा भात सकाळी फोडणी देऊन नाश्ता म्हणून खाण्याची सवय असते. नोकरदार महिला वेळेअभावी हेच अन्न गरम करून खातात. मात्र वारंवार गरम केल्याने त्यातील सत्त्व पूर्णपणे नष्ट होते. अन्न वाया जाऊ नये म्हणून ते खाण्यापेक्षा, ते तितकेच शिजवणे किंवा गरजू प्राण्यांना देणे केव्हाही चांगले. पण शिळे खाणे टाळणे व जास्तीत जास्त ताजे अन्न खाल्ले पाहिजे, असा सल्ला डॉ. जाधव देतात.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
गृहिणींनो, रिस्क का घेताय? तुमची जेवणाची ‘ही’ चूक आरोग्याला धोका, काहीही होऊ शकतं, Video
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement