Bank Holiday: बँकेत जाताय थांबा! एक दोन नाही 4 दिवस बंद राहणार बँक, काय आहे कारण?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रविवारसह रामकृष्ण जयंती, छत्रपति शिवाजी महाराज जयंती आणि मिझोराम अरुणाचल प्रदेश स्थापना दिवसामुळे मुंबई, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेशमध्ये बँका बंद.
काही कामानिमित्ताने तुम्ही बँकेत जाण्याचा प्लॅन करत असाल तर थांबा, त्याचं कारण म्हणजे बँक चार दिवस बंद राहणार आहे. आठवड्याची सुट्टी म्हणून रविवार आणि त्याशिवाय तीन दिवस वेगवेगळ्या कारणांमुळे बँक बंद राहणार आहे. RBI प्रत्येक महिन्याच्या सुट्ट्या जाहीर करत असते. त्यानुसार जर तुम्ही चेक क्लिअरन्स, KYC किंवा बँकेशी संबंधित इतर महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडणार असाल, तर एकदा सुट्यांची यादी नक्की तपासा.
तीन दिवस सुट्ट्या
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, स्थानिक सण आणि महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पुढील तीन दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील नागरिकांसाठी हे अपडेट महत्त्वाचे आहे. बुधवार १८ फेब्रुवारी रोजी रामकृष्ण जयंती आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल (कोलकाता) आणि सिक्कीममध्ये बँकांना सुटी असेल. महाराष्ट्रात या दिवशी बँका सुरू राहणार आहेत.
advertisement
महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँक?
गुरुवार १९ फेब्रुवारी छत्रपति शिवाजी महाराज जयंती आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे महाराष्ट्र (मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व शहरे) आणि कर्नाटकातील काही भागांत बँका पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे या दिवशी बँकेची ऑफलाइन कोणतीही कामं होणार नाहीत. मात्र तुम्ही ऑनलाईन सेवांचा आधार घेऊन कामं करू शकता.
advertisement
ऑनलाईन सेवा सुरू राहणार
शुक्रवार २० फेब्रुवारी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस आहे. या दिवशी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशचा राज्य स्थापना दिवस असल्याने ऐझॉल आणि ईटानगरमध्ये बँकांचे कामकाज होणार नाही. २२ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. बँका बंद असल्या तरी तुम्हाला काही कामं करता येणार आहेत. जसं की पैसे ट्रान्सफर, पैसे काढणे यासारख्या सुविधा तुम्ही वापरू शकता.
advertisement
फंड ट्रान्सफर आणि बिल पेमेंटसाठी तुम्ही NEFT/RTGS/IMPS चा वापर करू शकता. गुगल पे, फोनपे आणि पेटीएम यांसारखी अॅप्स नेहमीप्रमाणे सुरू राहतील. रोख रक्कम काढण्यासाठी एटीएम सुरू असतील, मात्र गर्दीमुळे काही ठिकाणी कॅशची कमतरता भासू शकते. जर तुम्हाला प्रत्यक्ष बँकेत जाऊन काम करायचे असेल २१ फेब्रुवारीची वाट पाहावी लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 1:16 PM IST










