advertisement

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला? दिल्लीतून समोर आली मोठी अपडेट....

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला तीन आठवडे उलटूनही अपघाताचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला? दिल्लीतून समोर आली मोठी अपडेट....
अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला? दिल्लीतून समोर आली मोठी अपडेट....
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला तीन आठवडे उलटूनही अपघाताचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जाणाऱ्या 'ब्लॅक बॉक्स'बाबत (Flight Data Recorder) दिल्लीतून मोठी अपडेट समोर आली आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स आता परदेशात पाठवण्यात येणार आहे.
२८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि इतर चार जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी दिली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयातील (एमओसीए) वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, एअर इंडिया अपघाताप्रमाणे, पवारांच्या प्रकरणात सहभागी असलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. मात्र, हा ब्लॅक बॉक्स जळालेल्या स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत सरकार पुढील एक-दोन दिवसांत निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. या ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर करण्यासाठी परदेशातून मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. 'एअर एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो'ने (AAIB) दिलेल्या माहितीनुसार, आता हे रेकॉर्डर डेटा रिकव्हरीसाठी संबंधित देशाच्या प्रयोगशाळेत पाठवले जाण्याची शक्यता आहे. तिथल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आगीने होरपळलेल्या डेटाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
advertisement
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानाच्या उड्डाणयोग्यतेची आणि ऑपरेशनल स्थितीची समांतर चौकशी सुरू केली आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी ऑपरेटिंग कंपनीकडून जप्त केलेल्या मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची तपासणी केली असल्याने, चौकशीला १० ते १५ दिवस लागण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला? दिल्लीतून समोर आली मोठी अपडेट....
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement