advertisement

Shocking : वडील अन् भावासोबत गेला तो परतलाच नाही; काही तासांत समोर आलं धक्कादायक सत्य, Pune Crime

Last Updated:

Pune News : खेड तालुक्यातील एका गावातील घटनेने सर्वजण हादरुन गेले आहे. जिथे भावा आणि वडीसोबत बाहेर गेलेला चिमुकला घरी परतलाच नाही.

News18
News18
पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुका येथील घोटवडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वडील आणि भावासोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आई वाट पाहत होती, पण आला तो आलाच नाही
मिळालेल्या माहितीनुसार, कैवल्य एकनाथ भोते (वय 10) असे मृत मुलाचे नाव असून तो वाशेरे भोतेवाडी येथील रहिवासी होता. रविवारी (15 फेब्रुवारी 2026) दुपारी तो आपल्या वडील आणि भावासोबत घोटवडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. पोहताना पाण्याची खोली लक्षात न आल्याने त्याचा तोल गेला आणि तो खोल पाण्यात बुडाला.
advertisement
विहीर सुमारे 40 ते 50 फूट खोल असल्याने शोधकार्य कठीण झाले. माहिती मिळताच खेड पोलिस, अग्निशामक दल आणि स्थानिक आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र विहिरीतील गाळ आणि पाण्याची खोली यामुळे मुलाचा शोध लागत नव्हता.
अखेर वारंगवाडी येथील नागरिकांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अवघ्या 10 मिनिटांत कैवल्यचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
advertisement
या घटनेनंतर प्रशासनाने पालकांना आवाहन केले आहे की मुलांना पाण्याजवळ एकटे सोडू नये आणि पाण्याची खोली तपासल्याशिवाय विहिरीत किंवा नदीत उतरू नये.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Shocking : वडील अन् भावासोबत गेला तो परतलाच नाही; काही तासांत समोर आलं धक्कादायक सत्य, Pune Crime
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement