बिग बॉसचा प्रोमो समोर आला आहे ज्यात निक्कीची आई बिग बॉसच्या घरात निक्कीला सांगताना दिसतेय की, “अरबाजने जे केलं ते बरोबर नाही. तो खूप चुकीचा चालला आहे. त्याने असं करायला नको होतं. त्याची एंगेजमेंट झाली आहे म्हणतात.”
advertisement
आईच्या या धक्कादायक खुलाशानंतर निक्की चांगलीच भडकली आहे. तिने दोघांचे नातं संपलं आहे असे घोषित केले. निक्कीबरोबर गोलीगत गेम झाल्याचे पाहून प्रेक्षकांनाही तिची दया आली.
तर दुसरीकडे घरबाहेर पडलेल्या अरबाजने हा प्रोमो पाहून प्रतिक्रिया दिली. अरबाजने त्याच्या इन्स्टाग्राम चॅनेलवर एक ऑडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने म्हटले, “मी नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो पाहिला. घरात निक्कीची आई आली आहे आणि त्या तिला सांगत आहेत की अरबाजचा साखरपुडा झाला आहे असे म्हणतायत”.
अरबाज पुढे म्हणाला, “मला एवढंच सांगायचं आहे की, माझा साखरपुडा झालेला नाही. लग्नही झालेलं नाही. या सगळ्या निव्वळ अफवा आहेत. मी खरं बोलतोय”.
“घरात निक्कीचे चिडणे स्वाभाविक आहे कारण तिला बाहेर काय घडतंय हे माहिती नाही. पण नंतर आम्ही भेटलो तर मी तिला सगळं सांगेन. तिला हे सगळं समजून घेतलं तर चांगलंच आहे. नाहीतर काही हरकत नाही”, असेही अरबाजने सांगितले.