Dp Dhananjay Powar : एकेकाळी डीपी दादांनी ट्रेनमध्ये मागितली भीक, चड्डी बनियनवर फिरण्याची आली होती वेळ

Last Updated:

Dp Dhananjay Powar begged in train : डीपी दादांनी कधीकाळी ट्रेनमध्ये भिक मागितली होती. स्वतः बिग बॉसच्या घरात डीपी दादांनी हा प्रसंग सांगितला.

धनंजय पोवार
धनंजय पोवार
मुंबई : कोल्हापूरचे रांगडे गडी धनंजय पौवर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी लाखोंची मनं जिंकली. त्यानंतर आता त्यांनी बिग बॉस मराठीमध्येही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. डीपी दादा आता बिग बॉस मराठीच्या टॉप 5 मध्येही पोहोचण्याच्या दिशेने आहेत. याच डीपी दादांनी कधीकाळी ट्रेनमध्ये भिक मागितली होती. स्वतः बिग बॉसच्या घरात डीपी दादांनी हा प्रसंग सांगितला होता.
डीपी दादा म्हणाले, "आम्ही मित्र तिरुपतीला गेलो होतो. परत येताना रिझर्वेशन दोन दिवस उशिरा होतं. काम झालं होतं आणि दर्शन झालं होतं म्हणून परत जायला निघालो. आम्ही सगळे मित्र विनातिकीट ट्रेनमध्ये बसलो. रात्रभर टीसी समोरून गेला की उगाचच काहीतरी गुणगुणत राहायचं. शेवटी आम्हाला एक फॉरेनर मिळाला. आमचा आणि इंग्रजी फार मोठा वांधा आहे. त्याला रात्रभर बोलायला कोण नव्हतं. त्याने बिरयाणी वगैरे मागवलं होतं. आम्ही त्याच्याबरोबर रात्रभर या या या करत होतो. टीसी समोरून जायचा तेव्हा आम्ही त्याच्या पुढ्यातली बिरयाणी खात बसायचो".
advertisement
ते पुढे म्हणाले, "त्याच ट्रेनमध्ये रात्री मी भिक मागितली होती. ती ही असंच. आमचं चॅलेंज लागलं होतं की ट्रेनमध्ये भीक मागायची. माझे वडील इचलकरंजीमध्ये फार प्रतिष्ठित नागरिक आहेत. माझ्या गळ्यात सोन्याची चैन होती तर मी शर्ट काढून, बनीयन आणि अंडरवेअरवर ट्रेन पुसत पुसत भिक मागितली आहे".
advertisement
"त्यातला योगायोग इतका मोठा की, आमच्या वडिलांचे मित्र मी असा करायला ( भिक मागण्यासाठी हात पुढे करायला ) आणि ते समोर यायला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर राम कृष्ण हरी. ते त्यांच्या घरी आणि पायताण आमच्या घरी", असेही डीपी दादांनी सांगितलं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dp Dhananjay Powar : एकेकाळी डीपी दादांनी ट्रेनमध्ये मागितली भीक, चड्डी बनियनवर फिरण्याची आली होती वेळ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement