विशालच्या नादात गेमची वाट लागली?
सुरुवातीला आक्रमक खेळणारी रुचिता गेल्या काही दिवसांपासून हरवलेली दिसत होती. तिचा संपूर्ण गेम विशाल या एकाच सदस्याभोवती फिरताना दिसत होता. रितेश भाऊंनी 'भाऊच्या धक्क्या'वर अनेकदा तिला तिची चूक समजावून सांगितली, तिला आरसा दाखवला, पण रुचिताने त्याकडे दुर्लक्ष केलं. रितेश भाऊंनी तिला स्पष्ट सांगितलं होतं की, "तुझं स्वतःचं अस्तित्व हरवत चाललंय." अखेर, तीच चूक तिला महागात पडली आणि तिला बिग बॉसच्या घराला निरोप द्यावा लागला.
advertisement
घरातून बाहेर पडताच रुचिताने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणाली, "बिग बॉसच्या या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला या खेळात लढायला बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते. आजचं एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार!"
घराबाहेर येताच रुचिता कोणाला भेटली?
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिताने सगळ्यात आधी कोणाची भेट घेतली असेल, तर ती म्हणजे पहिल्या आठवड्यात बाहेर पडलेली तिची लाडकी मैत्रीण राधा पाटील. या दोघींचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राधा म्हणाली, "मला वाईट वाटतंय की रुचिता लवकर बाहेर आली, पण एका अर्थी बरं झालं. मला स्किन ट्रीटमेंट करून घ्यायची होती आणि तिचा पत्ता हवा होता, ती लवकर आली ते चांगलंच झालं!" यावर दोघीही खळखळून हसल्या.
रुचिता घराबाहेर येताच सोशल मीडियावर संताप
रुचिताचं एलिमिनेशन तिच्या चाहत्यांच्या पचनी पडलेलं नाही. जरी तिचं वागणं आणि बोलणं अनेकांना खटकत होतं, तरीही ती एक 'मजबूत खेळाडू' होती यात शंका नाही. ती बाहेर पडताच ट्विटर (X) आणि इंस्टाग्रामवर #BringBackRuchita, #UnfairBiggBoss आणि #BoycottColors सारखे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहेत. एका बाजूला घरातील एक मोठा वाघ बाहेर पडला असताना, आता उरलेले सदस्य आपला गेम कसा बदलतात, हे पाहणं रंजक ठरेल.
