TRENDING:

आईनं पसंत केलेल्या मुलाशी बांधली लग्नगाठ, लग्नाच्या 2 महिन्यात मराठी अभिनेत्रीवर दु:खाच डोंगर

Last Updated:

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं आईच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं. सुखाचा संसार सुरू असताना अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला. अभिनेत्रीनं अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्यात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डिसेंबर महिन्यात अनेक कलाकारांची लग्न झाली. अभिनेत्री अभिनेत्रींनी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री न्हावरे. अभिनेत्रीनं 2 डिसेंबर रोजी लग्न केलं. भाग्यश्रीनं तिच्या आईच्या पसंतीच्या मुलाशी लग्नगाठ बांधली. तिचा सुखाचा संसार सुरू होता. तिनं तिची पहिली मकरसंक्रांत देखील साजरी केली. पण लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात भाग्यश्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला.
News18
News18
advertisement

भाग्यश्रीच्या अत्यंत जवळची व्यक्ती म्हणजेच तिच्या आईचं दु:खद निधन झालं. भाग्यश्रीची आई ऑटो इम्युन नावाच्या आजाराशी झुंज देत होती. लग्नावेळी भाग्यश्रीनं पोस्ट शेअर केली होती. त्यात तिनं लिहिलं होतं, "मी माझ्या आईला एक प्रॉमिस केल होत की मला या फिल्डमध्ये करियर करू दे तर मी तु म्हणशील त्या मुलाशी मी लग्न करेल. माझ्या आईने तीच प्रॉमिस पूर्ण केल आणि आज मी करतेय. माझ्या आईच स्वप्न मी पुर्ण करतेय."

advertisement

( Ronali Raut : 'आऊट' नाही झाली, Bigg Boss Marathi 6 मधून स्वत:च बाहेर पडली सोनाली राऊत, कारण शॉकिंग )

भाग्यश्रीनं आईच्या निधनानंतर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. तिनं लिहिलंय, "आई......! आज माझ्या लग्नाला फक्त दोन महिने पूर्ण होत आहेत, पण दोन महिन्यात आईने मला एकही फोन केला नाही. का तर "सासरी गेलेल्या मुलीला आई ने सारखा फोन करू नये. तिचं संसारात लक्ष लागत नाही." अश्या मताची माझी आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली. आणि आता माझ्या आईचा कधीच फोन येणार नाही. "

advertisement

"लग्नाला माझ्या दोन महिने पण झाले नाहीत पण तू मला सोडून गेलीस...हे मला मान्य होत नाहीये. मला शेवट पर्यंत तुझ्या पाशी रहायचा होत म्हणून मला लग्न न्हवत करायचं...पण तू....! ,"माझी शेवट ची इच्छा आहे राणा तू माझ्या साठी लग्न कर, आणि मागे वळून बघू नकोस, माझं काय पण होईल पण तू मागे वळून यायचं नाहीस. मुलगी म्हणून तू खूप जास्ती केलं आहेस..तू आता तुझा विचार कर माझ्यासाठी" खूप ठाम तिचा निर्णय. एका भेटीत मला तिने मला लग्नाचा निर्णय द्यायला भाग पाडलं. मी काय करते हे मला तेव्हा लक्षात आलं नाही. फक्त आई सांगतेय आणि आई ची इच्छा म्हणून या लग्नाला उभी राहिले. पण आई आज तू गेल्यावर मला कळलं आहे तू माझ्या साठी निवडलेला मुलगा आणि घर खरंच माझ्या साठी किती बरोबर आहे."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सात वाजताच होतात मोबाईल आणि टीव्ही बंद,या गावाचा कौतुकास्पद निर्णय
सर्व पहा

भाग्यश्रीनं शेवटी लिहिलंय, "तुझ्यासाठी मी लग्न केलं पण तू फक्त माझं लग्न पाहिले. माझा संसार पहायला तू मला आयुष्यभर हवी होतीस. माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करेल सांग ? दर पौर्णिमेला मी त्या सत्यनारायणाला दिवा लावायचे आणि तुझ्या साठी प्रार्थना करायचे. पण कालच्या पौर्णिमेला मी तुझ्या नारायणा सोबत तुझ्या चितेला नमस्कार करत होते. मला तू अशी सोडून जायला नको होतीस. तुला सगळं उपजत होत आई. म्हणून तू माझी सोय करून गेलीस. आईला लेकराच चांगलाच कळत हे खरच. पण तरीही आई तू मला हवी होतीस. आता मला कोण राणा म्हणेल. मला संसारात पाडलंस आणि तू मात्र निघून गेलीस. तू सांगितल्या प्रमाणे आई मी मागे वळून बघणार नाही हे तुला माझं वचन आहे."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
आईनं पसंत केलेल्या मुलाशी बांधली लग्नगाठ, लग्नाच्या 2 महिन्यात मराठी अभिनेत्रीवर दु:खाच डोंगर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल