अभिनेते भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम हिनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ सध्या चर्चा होतेय. भाऊ कदम यांच्या मुलीचं लग्न झालं अशा आशयाची व्हायरल पोस्ट तिनं शेअर केली आहे. अफवा पसरवणाऱ्या या पोस्टवर तिनं तिच्या स्टाइलनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
'मृण्मयीच्या लग्नात भाऊ कदम झाले भावूक, संघर्षाचे दिवस आठवून उपस्थितांच्या डोळ्यातही आलं पाणी', असं लिहिलेली एक पोस्ट शेअर करत मृण्मयीनं व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणतेय, "तुम्ही मला इव्हाइटच केलं नाही माझ्या लग्नात. हे योग्य नाही. मला तरी कळलं पाहिजे की मी मॅरिड आहे आणि तेही मी अमेरिकेत असून मी मॅरिड आहे हे मला आता कळलं. प्लिज मला माझ्या लग्नात बोलवा."
मृण्मयीने तिचं लग्न झाल्याच्या बातमीवर अशी प्रतिक्रिया देत मजेशीर पद्धतीनं कानउघडणी केली आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला असून त्यांनीही तिचं कमेंट करत अडवान्समध्ये अभिनंदन केलं आहे. एका युझरनं लिहिलंय, "लग्न खूपच प्रायव्हेट होतं वाटत म्हणून नवरी मुलीलापण नाही बोलावलं." दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "जाऊ दे.. झालं आता लग्न, जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा."
भाऊ कदमची मुलगी शिक्षणासाठी अमेरिकत आहे. त्याचबरोबर ती युट्यूब व्लॉगही करते. कंटेट क्रिएटर म्हणूनही ती काम करतेय.
