भीमाशंकरच्या दर्शनाने झाली पूर्ण यात्रा!
गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्ता माळीने १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची यात्रा सुरू केली होती. आज वाढदिवसाच्या निमित्ताने तिने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्याजवळील भीमाशंकर देवस्थानाचं दर्शन घेतलं, आणि याच दर्शनासोबत तिची ही यात्रा पूर्ण झाली.
प्राजक्ताने तिच्या कुटुंबीयांसोबत भीमाशंकर मंदिरात जाऊन पूजा केली. या भेटीचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती शंकराच्या पिंडीवर तीर्थ अर्पण करताना आणि मनोभावे पूजा करताना दिसत आहे. तिच्यासोबत तिची आई, दोन भाचे आणि वहिनीही दिसत आहेत.
advertisement
या फोटोंसोबत तिने एक भावूक पोस्ट लिहिली, "भीमाशंकर ज्योतिर्लिंग - पुणे - महाराष्ट्र. आणि अशाप्रकारे आज वाढदिवसाचं औचित्य साधून, भीमा नदीच्या काठी, निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या 'भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे' सहकुटुंब दर्शन घेऊन १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केली."
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत केदारनाथला जाऊन आली होती. तिथे दोघींनी एकत्र यात्रा पूर्ण केली होती. बद्रीनाथचंही दर्शन घेतलं होतं. आता भीमाशंकरच्या दर्शनानंतर तिच्या १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रवासाचा समारोप झाला आहे.