अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती 17' हा क्विझ गेम शो सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धकांनी आधीच लाखो रुपये जिंकले आहेत. या आठवड्यात मंगळवारच्या भागात हरियाणाच्या आशा धिर्यान हॉट सीटवर बसल्या होत्या. त्यांनी 10 प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. पण11 वा प्रश्न चुकला आणि त्यांना शोमधून बाहेर पडावं लागलं. दरम्यान चुकीचं उत्तर दिल्यानंतर बिग बींनी त्यांना जी प्रतिक्रिया दिली ती सध्या चर्चेत आली आहे.
advertisement
( Amitabh Bachchan: 'मी घाबरलो होतो...' जया बच्चन समोर अन् अमिताभ यांना फुटला घाम; नेमकं काय घडलेलं? )
आशा धिर्यान यांनी 10 प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन आधीच 5 लाख रुपये जिंकले होते. केबीसी 17 च्या मंगळवारीच्या भागाची सुरुवात 11 व्या प्रश्नाने झाली. ज्याची किंमत 7 लाख 50 हजार रुपये आहे. आशा उत्तराबद्दल गोंधळल्या होत्या. असे वाटत होते की त्या लाईफलाईन वापरतील, परंतु त्यांनी तसं केलं नाही आणि चुकीचं उत्तर दिलं.
11 वा प्रश्न काय होता?
बिग बी आशाला 11 वा प्रश्न वाचून दाखवतात: ‘एक पेड़ मां के नाम’ उपक्रमाचा भाग म्हणून जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवमध्ये कोणते झाड लावले होते? पर्याय: अ. नारळ, ब. फणस, क. आंबा, ड. वड. आशा घाईघाईने ड. वडाचा पर्याय निवडते, बरोबर उत्तर क. आंबा आहे.
अमिताभ बच्चन आशा धिर्यानला सांगतात की तिने चुकीचे उत्तर दिले. तिने लोभाला बळी पडायला नको होते. तिच्याकडे दोन लाइफलाइन होत्या आणि त्यांनी त्यांचा वापर करायला हवा होता. आशा धिर्यान BKC 17मधून फक्त 5 लाख रुपये घेऊन गेल्या.
बिग बीसोबत चहा प्यायल्या
केबीसी 17मध्ये आशा धिर्यानने अमिताभ बच्चनसोबत चहा घेण्याची इच्छा व्यक्त केली. बिग बीने लगेच शोमध्ये चहा मागवला आणि स्पर्धकांसोबत प्यायले. आशा धिर्याननी अमिताभ बच्चनला सांगितलं की, "तुम्ही ज्या कपातून चहा पीत आहात तो मला द्या. मी तो घरी शोकेसमध्ये ठेवेन." हे ऐकून बिग बी आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, "ए एसं कधीच करू नका, माझ्या घरी गडबड होईल." बिग बींचं हे वाक्य ऐकून केबीसीच्या सेटवरही जया बच्चन यांची दहशत आहे हे दिसून आलं आहे.