बिग बॉस 18चा प्रोमो समोर आला आहे. ज्यात घरातील पहिला नॉमिनेशन टास्क पाहायला मिळतोय. ज्यात करण वीर मेहरा म्हणतोय, “गुणरत्न सदावर्ते वेगळाच गेम खेळत आहेत.” हे ऐकून सदावर्ते भडकतात आणि करण वीरला नॉमिनेट करतात आणि “मी याला ओळखत नाही” असं म्हणतात. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळत आहे.
( कोणी फसवू नये म्हणून रितेश भाऊंनी दिला मॅनेजर, सूरजने सांगितलं व्हॅनिटी व्हॅनमध्ये काय घडलं? )
advertisement
विवियन डिसेना चाहत पांडेला नॉमिनेट करतो आणि “त्याला खूप अॅटिट्यूड आहे” असं कारण देतो. हे ऐकून विवियन म्हणतो, “हा अॅटिट्यूड तेव्हाच येतो जेव्हा समोरचा माणूस उद्धटपणे वागतो.” त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची होते.
प्रोमोच्या शेवटी बिग बॉस करण वीर, ईशा आणि अविनाश यांना एक विशेष अधिकार देतात. घरातील एका सदस्याला जेलमध्ये बंद करण्याच्या सूचना देतात. करण वीर जेलमध्ये जाण्यासाठी सदावर्ते यांचं नाव घेतो. पण सदावर्ते हे मान्य करत नाहीत. जेलमध्ये जाण्यास ते नकार देतात. सदावर्ते यांचा नॅशनल टेलिव्हिजनवर चांगलाच भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय. “मी नॅशनल टेलिव्हिजनवर अन्न पाण्याचा त्याग करेन” असा थेट इशारा ते देतात.