बिग बॉसमध्ये येण्याआधी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना शिल्पा म्हणाली होती, "ते दोघे माझ्यासाठी खूप आनंदी आहेत. त्यांना माझा खूप अभिमान आहे. मी जे काही करेन ते मी स्वतः करेन. मला माहित आहे की मला त्यांचा खूप अभिमान वाटेल. फॅमिली म्हणून आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. त्यांचा मला पाठिंबा आहे".
शिल्पाने नम्रता आणि महेशबद्दल बोलण्यास नकार दिल्याचं वृत्त इंडिया टुडेच्या एका दिवसानंतर ही मुलाखत समोर आली. शिल्पाने ‘तिची बहीण नम्रता शिरोडकर आणि मेव्हणा महेश बाबूबद्दल बोलण्यास नकार दिला,’ असं त्यांनी म्हटलं होतं.
advertisement
शिल्पा म्हणाली, "शोमध्ये लपवण्यासारखं तिच्याकडे काहीही नाही. माझ्याकडे कोणतेही सिक्रेच नाहीत आणि म्हणून मला सावध किंवा प्रतिमा-जागरूक राहण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः असेन आणि मनापासून खेळ खेळेन"
शिल्पा आणि सलमान खान यांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केलं आहे. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शिल्पाने किशन कन्हैया, खुदा गवाह, गोपी किशन, बेवफा सनम आणि रिटर्न ऑफ ज्वेल थीफ यासारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली होती. दुसरीकडे नम्रताने जब प्यार किसीसे होता है या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले आहे. नम्रता आणि सलमान एकमेकांना ओळखतात पण ते एकमेकांचे मित्र नाहीत.
याबिग बॉस 18 मध्ये शिल्पा शिरोडकरबरोबर नायरा बॅनर्जी, अविनाश मिश्रा, विवियन डिसेना, शेहजादा धामी, गुणरत्न सदावर्ते, सारा अरफीन खान, अरफीन खान, रजत दलाल, श्रुतिका अर्जुन राज, चाहत पांडे, ॲलिस कौशिक, हेमा शर्मा उर्फ विरल भाभी, तजिंदर बग्गा, छिंदम बग्गा यांच्याशी होईल. ट्रॉफीसाठी ईशा सिंग, करणवीर मेहरा आणि मुस्कान बमने हे सदस्य आहेत.