Bigg Boss 18 : "सदावर्तेंना जेलमध्ये टाका", सदस्यांच्या मागणीवर उडाला रागाचा भडका, वकिलांनी थेट अन्नपाणीच सोडलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस 18चा प्रोमो समोर आला आहे. ज्यात घरातील पहिला नॉमिनेशन टास्क पाहायला मिळतोय. ज्यात सदस्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अन्न -पाणी सोडण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : बिग बॉसचा 18वा सीझन सुरू झाला आहे. सीझन सुरू झाल्या झाल्या घरातील सदस्यांनी चांगलाच गोंधळ घातलाय. घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडलं ज्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. घरात पहिला टास्क पार पडला. या टास्कमध्ये घरातील सगळ्या सदस्यांचे खरे चेहरे समोर आले. विवियन डिसेना आणि चाहत पांडे यांची तक्रार करण्यात आली. तर गुणरत्न सदावर्ते यांनी जेलमध्ये जाण्यास नकार दिला. नॅशनल टीव्हीवर अन्न पाण्याचा त्याग करेन असा थेट इशारा त्यांनी दिला.
बिग बॉस 18चा प्रोमो समोर आला आहे. ज्यात घरातील पहिला नॉमिनेशन टास्क पाहायला मिळतोय. ज्यात करण वीर मेहरा म्हणतोय, “गुणरत्न सदावर्ते वेगळाच गेम खेळत आहेत.” हे ऐकून सदावर्ते भडकतात आणि करण वीरला नॉमिनेट करतात आणि “मी याला ओळखत नाही” असं म्हणतात. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळत आहे.
advertisement
विवियन डिसेना चाहत पांडेला नॉमिनेट करतो आणि “त्याला खूप अॅटिट्यूड आहे” असं कारण देतो. हे ऐकून विवियन म्हणतो, “हा अॅटिट्यूड तेव्हाच येतो जेव्हा समोरचा माणूस उद्धटपणे वागतो.” त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची होते.
Tomorrow Promo #BiggBoss18: Nomination Special - Vivian Dsena Vs Chahat Pandey. And Gunratan special.pic.twitter.com/UCB08t702q
— #BiggBoss_Tak (@BiggBoss_Tak) October 8, 2024
advertisement
प्रोमोच्या शेवटी बिग बॉस करण वीर, ईशा आणि अविनाश यांना एक विशेष अधिकार देतात. घरातील एका सदस्याला जेलमध्ये बंद करण्याच्या सूचना देतात. करण वीर जेलमध्ये जाण्यासाठी सदावर्ते यांचं नाव घेतो. पण सदावर्ते हे मान्य करत नाहीत. जेलमध्ये जाण्यास ते नकार देतात. सदावर्ते यांचा नॅशनल टेलिव्हिजनवर चांगलाच भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय. “मी नॅशनल टेलिव्हिजनवर अन्न पाण्याचा त्याग करेन” असा थेट इशारा ते देतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2024 8:47 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 18 : "सदावर्तेंना जेलमध्ये टाका", सदस्यांच्या मागणीवर उडाला रागाचा भडका, वकिलांनी थेट अन्नपाणीच सोडलं