घरातील सदस्यांना मिळाली शिक्षा
बिग बॉस कॅप्टन अमाल मलिकला नॉमिनेशनचे नियम वाचायला सांगतात. अमाल नियम वाचताना सांगतो की, नामांकनावर चर्चा करणे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानंतर 'बिग बॉस' घरातील सदस्यांची शाळा घेतात आणि म्हणतात की मागील 18 सीझनमध्ये आजवर असं कधीच घडलेलं नाही पुढे थेट सर्व घरच्यांना थेट घराबाहेर जाण्यासाठी नामिनेट करून टाकतात.
advertisement
Dashavatar : 'दशावतार' ऑनलाईन लीक! चित्रपटाच्या टिमची प्रेक्षकांना कळकळीची विनंती; म्हणाले, "मराठी माणसांनी तरी..."
घरातील सदस्यांना मिळाली दुसरी संधी
'बिग बॉस'पुढे घरातील सदस्यांना पुन्हा एकदा बोलावतात आणि त्यांना दुसरी संधी देतात. या आठवड्यातील काही सदस्यांना नॉमिनेशनपासून वाचण्यास सांगतात.
बिग बॉस घरच्यांना लोकशाहीच्या आधारावर दोन-दोन स्पर्धकांची नावे सांगायला सांगतात, ज्यांना ते वाचवू इच्छितात. मतांच्या आधारे नीलम गिरी, गौरव खन्ना, फरहाना भट्ट, तान्या मित्तल, आवेज दरबार, शहबाज बदेशा, जीशान कादरी, मृदुल तिवारी आणि कुनिका सदानंद यांना नॉमिनेशन प्रक्रियेपासून वाचविण्यात आले आहे. तर दुसरीकडे, नेहल चुडासामा, अशनूर कौर, प्रणित मोरे, बसीर अली आणि अभिषेक यांच्या डोक्यावर अजूनही नॉमिनेशनची तांगती तलवार आहे.
अमाल मलिककडून खास अधिकार काढून घेतले
'बिग बॉस' सांगतात की, नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अमाल मलिककडून कॅप्टन म्हणून मिळालेले विशेष अधिकार आता काढून घेतले गेले आहेत. अभिषेक, अशनूरला विचारतो की, तिने कुणाला मत दिलं, तेव्हा ती तान्या आणि गौरवचं नाव सांगते. त्याचवेळी बसीर याबाबतीत दुःखी होतो की सगळे त्याच्यासोबत फिरतात, पण कुणीही त्याला पाठिंबा देत नाही.