Dashavatar : 'दशावतार' ऑनलाईन लीक! चित्रपटाच्या टिमची प्रेक्षकांना कळकळीची विनंती; म्हणाले, "मराठी माणसांनी तरी..."
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dashavatar Online Leak :दिलीप प्रभावळकर अभिनीत थिएटर गाजवणारा आणि कोकणातील परंपरेची झलक दाखवणारा 'दशावतार' हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे.
Dashavatar Online Leak : 'दशावतार' हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाचे स्क्रींग वाढवण्यात येत आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईचा आकडादेखील वाढता असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दिलीप प्रभावळकर अभिनीत थिएटर गाजवणारा आणि कोकणातील परंपरेची झलक दाखवणारा हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. अखेर चित्रपटाच्या टिमने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमा चित्रपट लीक न करण्याबाबत प्रेक्षकांना आणि नेटकऱ्यांना विनंती केली आहे. 'दशावतार' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरनेही यासंदर्भात पोस्ट शेअर करत चाहत्यांना कळकळीची विनंती केली आहे.
'दशावतार'च्या टिमची चाहत्यांना कळकळीची विनंती!
'दशावतार' चित्रपटातील कलाकारांनी आपल्या इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून प्रेक्षकांना कळकळीची विनंती केली आहे की,"आपल्या 'दशावतार' चित्रपटाला तुम्हा रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. मराठी प्रेक्षकांची ताकद काय आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक चित्रपटगृहात दिसतंय. पण त्याचवेळी काही लोक चित्रपटाची चोरुन काढलेली प्रत फोनवर डाऊनलोड करुन पाहत आहेत. चित्रपटाच्या पायरसीविरुद्ध कारवाई सुरू आहेच. परंतु आपल्याच माणसांनी आपल्या चित्रपटाबद्दल असं करणं दु:खद आहे".
advertisement

प्रियदर्शिनीने पुढे लिहिलं आहे,"चित्रपट हा चित्रपटगृहातच जाऊन घ्यायचा अनुभव आहे. त्यासाठी शेकडो लोकांची मेहनत आणि पैसा लागलेला आहे. निदान मराठी माणसांनी तरी अशा चोरटेपणाला थारा देऊ नये. स्वत:ही अशी पायरेटेड प्रिंट फोनवर पाहू नये आणि इतरांनाही त्यापासून रोखावं ही विनंती!. आपल्याच सहकार्यातून मराठी चित्रपट जगणार, तगणार आणि वाढणार". प्रियदर्शनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे".
advertisement
'दशावतार' चित्रपटाचा राखणदार हा खऱ्या अर्थाने मराठी प्रेक्षकवर्ग आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोलाचा प्रतिसाद मिळतोय. कोकणाचं सौंदर्य असो, दिलीप प्रभावळकरांनी साकारलेली बाबुली मेस्त्रीची भूमिका असो, सुबोध खानोलकरचं दिग्दर्शन असो चित्रपटातील प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या सर्व गोष्टींमुळेच या चित्रपटाला प्रेक्षकांचं हाऊसफुल प्रेम मिळत आहे. जगभरात या चित्रपटाने सहा कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
advertisement
'दशावतार' या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुनील तावडे, अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाताला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळतोय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dashavatar : 'दशावतार' ऑनलाईन लीक! चित्रपटाच्या टिमची प्रेक्षकांना कळकळीची विनंती; म्हणाले, "मराठी माणसांनी तरी..."