बांबूच्या झोळीतून 7km चिखल तुडवत पार केला रस्ता; आई वाचली, पण नवजात बाळानं सोडला जीव, कोण जबाबदार?

Last Updated:

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात रस्त्याच्या अभावामुळे उपचारासाठी नवजात बाळासह मातेला 10 किलोमीटर झोळीतून प्रवास करण्याची...

Nandurbar News
Nandurbar News
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात रस्त्याच्या अभावामुळे उपचारासाठी नवजात बाळासह मातेला 10 किलोमीटर झोळीतून प्रवास करण्याची वेळ आली आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
तळोदा तालुक्यातील नयामाळ येथील जानू सिमजी वसावे यांच्या पत्नीची घरीच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर आई आणि बाळाला मोदलपाडा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्याची गरज होती. परंतु, गावात रस्ता नसल्याने त्यांना बांबूच्या झोळीतून प्रवास करावा लागला.
पती जानू वसावे आणि आशा वर्कर अनिता वसावे यांनी बाळाला आणि मातेला खांद्यावर घेऊन चिखलातून प्रवास सुरू केला. रिमझिम पावसात, चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून त्यांना नयामाळ ते इच्छागव्हाण हे 10 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल 7 तास लागले.
advertisement
उपचार मिळण्याआधीच बाळाचा मृत्यू
इच्छागव्हाण येथे पोहोचल्यानंतर त्यांना सरकारी वाहन मिळाले आणि त्यातून मोदलपाडा आरोग्य केंद्रात पोहोचवण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, बाळाचा आधीच मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे पालकांनी मोठा आक्रोश केला.
ग्रामस्थांची नाराजी
नयामाळ ते इच्छागव्हाण या गावांना जोडणारा रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना आजही अशा परिस्थितीत पायपीट करावी लागते. अनेक वर्षांपासून रस्ता मिळावा अशी मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बांबूच्या झोळीतून 7km चिखल तुडवत पार केला रस्ता; आई वाचली, पण नवजात बाळानं सोडला जीव, कोण जबाबदार?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement