Tea Side Effects : चहाचं आहे व्यसन, पण जिभेवर जाणवतोय 'हा' बदल? डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आपल्यापैकी बऱ्याच लोकांची सकाळ एका गरम चहाने होते. अनेकांना सकाळी उठताच चहा प्यायची सवय असते. पण काही वेळा आणि काही लोकांसाठी हे पूर्णपणे चुकीचे आहे
Drinking Tea : आपल्यापैकी बऱ्याच लोकांची सकाळ एका गरम चहाने होते. अनेकांना सकाळी उठताच चहा प्यायची सवय असते. पण काही वेळा आणि काही लोकांसाठी हे पूर्णपणे चुकीचे आहे. झोपेतून उठल्यावर लगेच चहा पिणं किती योग्य आणि किती अयोग्य हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ. सकाळी उठल्यावर अनेक लोकांच्या जिभेवर पांढरा थर जमा झालेला दिसतो. हा थर सामान्यतः मृत पेशी, बॅक्टेरिया आणि अन्नाचे कण जमा झाल्यामुळे तयार होतो. अशा वेळी, चहा पिणे योग्य आहे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. वैद्य सुयोग दांडेकर यांच्या मते, जिभेवर पांढरा थर असताना चहा पिणे पूर्णपणे चुकीचे आहे, अशावेळेस काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
नेमकं कधी चहा प्यावा?
वैद्य सुयोग दांडेकर यांच्या मते, ज्यांना सकाळी उठल्यावर चहा पिण्याची सवय आहे किंवा व्यसन आहे त्यांनी आधी जिभेवर पांढरा थर नाही ना याची काळजी घ्यावी. जर चहा पिण्यापूर्वी किंवा प्यायल्यानंतर पांढरा किंवा चहाचा थर जिभेवर जाणवत असेल, तर त्याचा अर्थ तुमचं चयापचय लो आहे. आणि अशावेळेस चहा पिणं हानिकारक ठरू शकत.
advertisement
शुगर फ्री की गुळाचा चहा?
तज्ज्ञांच्या मते, साखर किंवा गुळ तुम्ही चहामध्ये गोडासाठी काय वापरता हे महत्वाचं नाही कारण गूळ आणि साखर उसापासूनच बनवलेले आहेत. एखाद्या व्यक्तीला जर चहाच व्यसन असेल तर तो व्यक्ती शुगर फ्री चहा पित असेल तरी त्याला अनेक गंभीर आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागेल. शुगर फ्री चहा देखील पीत असाल तरी त्याचे प्रमाण महत्वाचे असते. कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केल्याने त्याचे दुष्परिणाम होतात. तुम्ही अति प्रमाणात शुगर फ्री चहा जरी पीत असाल तर IBS, क्रोन्स डिसिज यांसारखे आजार होऊ शकतात.
advertisement
मग चहा कसा प्यावा आणि कधी?
चहाच व्यसन असलेल्यांनी चहा पिणं थांबवणं जवळजवळ अशक्य आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी सांगितले आहे की, चहा बनवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. चहा बनवताना अनेकजण आधी पाणी उकळून त्यात चहा पावडर टाकून मग दूध एकत्र करतो. पण तज्ञांच्या मते हे चुकीचे आहे. चहा बनवताना पाणी आणि दूध एकत्रित उकळून घावे त्यांनतर त्यात चहा पावडर, आणि जे मसाले तुम्ही घालता ते घालावेत. गूळही असाच लोकांनी घालावा ज्यांना डायबिटीज नाही. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 8:07 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tea Side Effects : चहाचं आहे व्यसन, पण जिभेवर जाणवतोय 'हा' बदल? डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण