Weather Alert: विजा कडाडणार, वारे वाहणार, पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुण्यासह 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather alert: पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. आज पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असून पुण्यासह 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
राज्यात जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. आज 18 सप्टेंबर रोजी राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. वादळी पावसाला पोषक हवामान असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरात मागील 24 तासात 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 30.4 अंश सेल्सिअस इतका राहिला. आज पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. तसेच विजांसह वादळी पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

3/7
सातारा जिल्ह्यात बुधवारी 0.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज साताऱ्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. आज गुरुवारी सातारा जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह प्रतितास 30 ते 40 किलोमीटर वेगवान वारे वाहील वाहतील.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 0.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 27.9 अंश सेल्सिअस राहिले. आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 25 अंशावर राहिल. जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यास सतर्कतेचा येलो अलर्ट दिला आहे.

5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात 4 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. तसेच बुधवारी सोलापूर जिल्ह्यात 30.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंशावर राहिल. तसेच विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 0.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 28.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. आज गुरुवारी सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

7/7
पुढील 24 तास राज्यात पावसाचे वातावरण कायम आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची सूचना हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यातील बहुतांश ठिकाणी विजांसह वादळी पाऊस कोसळू शकतो.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement