मालतीबद्दल कुनिका काय म्हणाली?
तान्या मित्तल सोबत बोलत असताना कुनिका म्हणाली,"एक गोष्ट बोलायचं आहे. मालती मॅडम आहेत ना, मला पूर्ण विश्वास आहे की ती लेस्बियन आहे". मालतीच्या या विधानावर तान्याचा मात्र काही प्रतिसाद मिळाला नाही. पण कुनिका यावर सातत्याने बोलत राहिली. कुनिका म्हणाली,"तिचे हावभावही काहीसे तसेच दिसतात आणि ज्या प्रकारे ती बोलते, त्याकडे लक्ष द्या". तिच्या या दाव्यामुळे आता कुनिका सदानंद जोरदार ट्रोल होत आहे.
advertisement
कुनिकावर नेटकरी भडकले
कुनिका सदानंद आपल्या या वक्तव्यामुळे ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे,"नॅशनल टीव्हीवर कोणाच्या सेक्सुअॅलिटीबद्दल प्रश्न विचारणे चुकीचे आहे. कुनिकाला लाज वाटायला हवी.". दुसऱ्याने लिहिले,"आता वीकेंडला तिला कळेल की काय बोलत आहे". तर दुसरीकडे तान्याचे चाहते मात्र या सगळ्यापासून दूर राहिल्यामुळे तिचं कौतुक करत आहेत.
रोहित शेट्टी घेणार शाळा
'बिग बॉस 19'च्या आगामी वीकेंड का वार'मध्ये या आठवड्यात सलमान नव्हे तर रोहित शेट्टी स्पर्धकांची शाळा घेताना दिसून येईल. नुकताच वीकेंडचा वारचा प्रोमो आऊट झाला आहे. यात रोहित शेट्टी 'बिग बॉस 19'चा एपिसोड होस्ट करताना दिसत आहे. या आठवड्यात तो बिग बॉसला बायस्ट म्हणून संबोधल्याबद्दल अमाल मलिक आणि शहबाज बदेशाची शाळा घेताना दिसेल.
