TRENDING:

Bigg Boss 19 : 'बिग बॉस'च्या घरात मोठं वादळ, तान्या मित्तलवर FIR दाखल, काय आहे प्रकरण?

Last Updated:

Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' या कार्यक्रमातील तान्या मित्तल सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. तिच्या मोठमोठ्याने बोलण्याची स्टाइल अनेकांच्या पसंतीस उतरते. पण याच बोलण्याने तिच्यावर आता FIR दाखल करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता एपिसोडमधील तान्या मित्तल ही स्पर्धक सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. यामागचं एक कारण म्हणजे तिचे मोठमोठे बोलणे. आता या मोठ्या बोलण्यांमुळे तान्या शहबाजच्या निशाण्यावर आली आहे. 'बिग बॉस 19' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आल्याने सर्वच स्पर्धक खूप मेहनत घेताना दिसत आहेत. प्रत्येकजण खेळ जिंकण्याच्या स्पर्धेत आहे. गेल्या एका आठवड्यात 3 स्पर्धक शोमधून बाहेर गेले आहेत आणि आता पुन्हा 'वीकेंड का वार' आला आहे. या वेळी 'वीकेंड का वार' सलमान खानच्या ऐवजी रोहित शेट्टी होस्ट करत आहे. कारण भाईजान आपल्या दबंग टूरमध्ये व्यस्त आहे.
News18
News18
advertisement

वीकेंडच्या वारदरम्यान, रोहित शेट्टीने आठवड्याभरातील सर्व मुद्द्यांवरुन स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. आता शोच्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये रोहित शेट्टी 'बिग बॉस 19'मधील स्पर्धकांसोबत टास्क खेळताना दिसणार आहे. या टास्कदरम्यान शहबाज बदेशा, तान्या मित्तलवर FIR दाखल करताना दिसत आहे.

तान्याने गौरव खन्नावर दाखल केली FIR

'बिग बॉस 19'च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये होस्ट रोहित शेट्टी घरकुलातील लोकांना एका बोर्डबद्दल सांगत आहेत. ज्यावर काही FIR लावलेल्या आहेत. टास्कबद्दल सांगताना ते म्हणतात,"मी FIR वाचेन, तुम्हाला सांगायचे आहे की ही FIR कोणावर दाखल करायची आहे". यानंतर रोहित शेट्टी, तान्याला विचारतात,"कोण आहे जो तुम्हाला फेक म्हणतो, पण स्वतः फेक आहे?". यावर तान्या गौरव खन्नाचे नाव घेते आणि म्हणते,"गौरव जी, चमचा, आलं, भेंडी, कांदा… याशिवाय इतर कोणताही मुद्दा नाही". यानंतर रोहित शेट्टी अशनूरला विचारतात,"मैत्री कोण करतो?". या प्रश्नाचं उत्तर देत अशनूर उत्तर देतो,"अशनूर उत्तर देतो,"तान्या, तिने फरहानाशी मैत्री केली आहे, पण ती अर्थपूर्ण मैत्री आहे". तान्या पुढे आपला बचाव करत म्हणते,"अशनूरच्या डोळ्यात फिल्टर आहे. तान्या वाईट आहे आणि हा सगळा गेम त्या फिल्टरमध्ये पाहत आहे".

advertisement

शहबाज बदेश्याने तान्या मित्तलवर दाखल केली FIR

प्रोमोच्या शेवटी रोहित शेट्टी शहबाजला विचारतात,"कोण स्वतःच्या प्रेमात गोंधळलेला आहे?". या प्रश्नाचं उत्तर देत शहबाज म्हणते,"तान्याला वाटतं की मी बाहेर जाऊन काही केले आहे, परंतु कोणीही केले नाही आणि जे आत करत आहे, ते कोणी करू शकत नाही".,हे ऐकून तान्या आणि होस्ट रोहित शेट्टीसह सर्व मंडळी हसतात. तान्या हसत हसत आपला चेहरा लपवते आणि घराच एकच हशा पिकतो.

advertisement

कोण घेणार घराचा निरोप?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दागिने नाही तर... पुणेकर या लाख मोलाच्या वस्तू मोफत पाहता येणार, कधी आणि कुठं?
सर्व पहा

'बिग बॉस 19'च्या नुकत्याच पार पडलेल्या वीकेंड का वारमध्ये रोहित शेट्टीने संगीतकार अमाल मलिकची चांगलीच शाळा घेतली आहे. कारण अमालने गौरवच्या कॅप्टनपदाबाबत घरात खूप गदारोळ केला होता. आता या वीकेंडच्या वारमध्येही कोणाला तरी घरातून बाहेर जावे लागणार आहे. सध्या गौरव खन्ना, फरहाना भट्ट, तान्या मित्तल, अमाल मलिक, मालती चाहर, अशनूर कौर आणि कुनिका सदानंद डेंजर झोनमध्ये आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19 : 'बिग बॉस'च्या घरात मोठं वादळ, तान्या मित्तलवर FIR दाखल, काय आहे प्रकरण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल