दागिने अन् गाडी नाही तर...पुणेकर या लाख मोलाच्या वस्तू मोफत पाहता येणार, कधी आणि कुठं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune News: सात दशकांहून अधिक काळ चालत आलेल्या कलेच्या परंपरेला यंदा 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने खास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे : पुण्यातील मंदाकिनी परांजपे यांच्या भरतकाम आणि पेंटिंग क्लासेसला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने राजा रवि वर्मा कलादालन येथे विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात 100 रुपयांपासून ते 1 लाखापर्यंतच्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती गिरिजा परांजपे यांनी लोकल18 ला दिली आहे.
गिरिजा परांजपे यांनी सांगितलं की, या प्रदर्शनात विविध हस्तकला वस्तू मांडण्यात आल्या आहेत आणि काही वस्तू विक्रीसाठीही ठेवण्यात आल्या आहेत. सर्व वस्तू महिलांनी बनवलेल्या आहेत आणि काही वस्तूंची किंमत लाखाच्या पुढे आहे. पुणेकरांचा या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे हे प्रदर्शन विनामूल्य आहे. 16 नोव्हेंबरला म्हणजे आज सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत राजा रवि वर्मा कलादालनात पाहता येणार आहे.
advertisement
75 वर्षांचा रेशीम धाग्यांचा वारसा
view comments1950 साली आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून मंदाकिनी परांजपे यांनी भरतकामाबरोबरच पेंटिंगचे क्लासेस सुरू केले. सुरुवातीला काही जणींना शिकवण्यापासून सुरू झालेला हा उपक्रम हळूहळू वाढत गेला आणि आज तो वटवृक्ष झाला आहे. पुढे मंदाकिनी परांजपे यांच्यानंतर त्यांच्या सूनबाई ललिता परांजपे यांनीही हे कार्य तितक्याच उत्साहाने पुढे नेले. सात दशकांहून अधिक काळ चालत आलेल्या या परंपरेला यंदा 75 वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्ताने खास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 16, 2025 12:39 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
दागिने अन् गाडी नाही तर...पुणेकर या लाख मोलाच्या वस्तू मोफत पाहता येणार, कधी आणि कुठं?

