Astrology: तिप्पट लाभ-तिप्पट पैसा! ग्रहांची अनोखी युती 4 राशीच्या लोकांचे दिवस अचानक बदलणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Gochar 2025: माझ्या राशीला चांगले दिवस कधी येतील, याकडे नजरा लावून बसलेल्या लोकांसाठी चांगली बातमी सांगणार आहोत. आजच सूर्याची वृश्चिक संक्रात आहे, म्हणजे सूर्य वृश्चिक राशीत आजपासून महिनाभर गोचर करेल. वृश्चिक संक्रीतीसोबत जुळून येत असलेले शुभ योग काही राशीच्या लोकांसाठी शुभफळ देणारे ठरतील.
आज 16 नोव्हेंबर रोजी, ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल, वृश्चिक राशीत आधीच बुध आणि मंगळ उपस्थित आहेत. वृश्चिक राशीत सूर्य, मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे अनेक शुभ योग निर्माण होत आहेत. तीन ग्रहांच्या युतीमुळे बुधादित्य योग, आदित्य मंगल योग, त्रिग्रही योग आणि द्विग्रह योग तयार होईल. यामुळे 12 पैकी 4 राशीच्या लोकांना धन, आरोग्य, करिअर आणि व्यवसाय यासह प्रत्येक क्षेत्रात तिप्पट फायदे मिळतील. कोणत्या राशींना कसा लाभ होईल त्याविषयी सविस्तर पाहुया.
advertisement
वृषभ - वृश्चिक राशीतील ग्रहांच्या मेळाव्याचा वृषभ राशीच्या लोकांना फायदा होईल. वृषभ राशीच्या लोकांना अधिक प्रवास करावा लागू शकतो, पण, तो फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला परदेशात नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात, व्यवसाय करणारे वृषभेचे लोक चांगले पैसे कमवू शकतात. मार्केटिंगमध्ये असणाऱ्यांना लाभ होतील. गुंतवणूक भविष्यात लाभदायी ठरेल. तुमचे सर्वांशी संबंध चांगले राहतील.
advertisement
कर्क - वृश्चिक राशीत सूर्य, बुध आणि मंगळाचा युती कर्क राशीसाठी उत्तम राहणार आहे. तुमच्यावरील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण कराल. ऑफिसमधील मोठा ताण-तणाव नाहीसा होऊन सर्वांसोबत तुमचे संबंध दृढ होतील. ग्रहांच्या शुभ स्थितीमुळं तुमचं घर किंवा वाहन खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. कुटुंबातील आरोग्याबद्दलच्या कोणत्याही चिंता दूर होतील.
advertisement
वृश्चिक - सगळं वृश्चिक राशीतच होत असल्यानं वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. शुभ संयोगामुळे वृश्चिक राशीचे लोक अधिक पैसे कमवू शकतात घरात चांगलं वातावरण ठेवण्याच तुम्ही यशस्वी व्हाल. या राशीच्या ज्या लोकांना कामासाठी, शिक्षणासाठी किंवा प्रवासासाठी परदेशात प्रवास करण्याची इच्छा आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.
advertisement
मकर - सूर्य, मंगळ आणि बुध यांच्या संयोगामुळे मकर राशीच्या लोकांचे अडकलेला पैसे परत मिळण्यास मदत होईल, अनेक अपूर्ण कामे अडचणीशिवाय पूर्ण होतील. दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. ग्रहस्थिती चांगली असल्यानं मकर राशीचे लोक कमाई चांगली करू शकतील. घरात आणि जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. पैसा समाधान देईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


