काहीही केलं तरी 'या' 4 राशींच्या लोकांना शनीमुळे सोसावे लागतात हाल, कोणावर असतात नेहमीच मेहरबान?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला 'न्यायदेवता' आणि 'कर्मफळदाता' मानले जाते. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मांनुसार फळ देतात. ज्यांच्यावर शनीची वक्रदृष्टी पडते, त्यांच्या आयुष्यात संघर्षाचा काळ सुरू होतो, तर ज्यांच्यावर शनिदेव प्रसन्न होतात, त्यांना शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद मिळते.
Shani : ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला 'न्यायदेवता' आणि 'कर्मफळदाता' मानले जाते. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मांनुसार फळ देतात. ज्यांच्यावर शनीची वक्रदृष्टी पडते, त्यांच्या आयुष्यात संघर्षाचा काळ सुरू होतो, तर ज्यांच्यावर शनिदेव प्रसन्न होतात, त्यांना शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद मिळते. 2026 हे वर्ष शनीच्या प्रभावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण या वर्षी शनिदेव संपूर्ण काळ मीन राशीत विराजमान असतील. शनीच्या या स्थितीमुळे काही राशींना राजयोगासारखे फळ मिळत आहे, तर काही राशींना संघर्षाचा सामना करावा लागत आहे.
शनिदेव यांच्या प्रिय राशी
तूळ
ही शनीची 'उच्च' रास आहे. या राशीच्या लोकांवर शनिदेव नेहमीच कृपा करतात. तूळ राशीच्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केल्यास शनिदेव त्यांना अपार संपत्ती आणि सन्मान देतात.
मकर व कुंभ
या दोन्ही राशींचा स्वामी स्वतः शनिदेव आहेत. त्यामुळे आपल्या मुलाप्रमाणे शनिदेव या राशींच्या जातकांचे रक्षण करतात. जरी या राशींवर साडेसाती आली, तरी त्यांना कष्टांचे फळ मिळतेच.
advertisement
वृषभ व मिथुन
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि मिथुनचा स्वामी बुध या दोघांशी शनीची घट्ट मैत्री आहे. त्यामुळे या राशींना शनी सहसा त्रास देत नाही, उलट त्यांच्या प्रगतीत मदत करतो.
शनिदेव कोणत्या राशींना देतात कष्ट?
मेष
मेष ही शनीची 'नीच' रास मानली जाते. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना शनीच्या काळात आरोग्याच्या आणि स्वभावातील चिडचिडेपणाच्या समस्या जाणवतात.
advertisement
सिंह
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य आणि शनी यांच्यात पिता-पुत्राचे नाते असले तरी त्यांच्यात कट्टर शत्रुत्व आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना शनीच्या साडेसाती किंवा ढैय्या काळात कडक शिस्तीचा आणि संघर्षाचा सामना करावा लागतो.
कर्क व वृश्चिक
या राशींच्या स्वामींशी शनीचे जमून घेत नाही. त्यामुळे या राशींना भावनिक चढ-उतार आणि आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 5:59 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
काहीही केलं तरी 'या' 4 राशींच्या लोकांना शनीमुळे सोसावे लागतात हाल, कोणावर असतात नेहमीच मेहरबान?










