मुंब्र्यात राजकीय रणकंदन, मुलीचं तिकीट कापताच युनूस शेख आक्रमक, भर सभेत आव्हाडांना इशारा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
महापालिका निवडणुकीत युनूस शेख यांच्या मुलीचे शरद पवार गटाकडून तिकीट कापण्यात आल्याने त्यांनी आव्हाडांवर टीका केली.
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे तिकीट मुलीला न दिल्याने जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे जवळचे मित्र युनिस शेख यांनी त्यांच्यावरच जोरदार प्रहार केले.
महापालिका निवडणुकीत युनूस शेख यांच्या मुलीचे शरद पवार गटाकडून तिकीट कापण्यात आल्याने त्यांनी आव्हाडांवर टीका केली.
मी तिकीट देऊ शकत नाही, माझ्याजवळ निधीही नाही, असे त्यांनी मला सांगितले. मग माझा त्यांना सवाल आहे की मग तुम्ही टाळ्या वाजविण्यासाठी आमच्या परिसरात येता की काय? अशी बोचरी टीका युनूस शेख यांनी केली. त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश करून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.
advertisement
विधानसभा निवडणूक 2024 वेळच्या वचननामा प्रकाशनावेळी युनूस शेख यांचा फोटो टेम्प्लेटवर न लावल्याने वाद झाला होता. फोटो न टाकल्याच्या रागातून भर सभेत जितेंद्र आव्हाडांवर शेख यांनी उघड टीका आणि शिवीगाळ केली. मुलाचा प्रचार करत असताना भर जाहीर सभेत याच माणसाने तुला पाया पडायला भाग पाडले होते, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
advertisement
जितेंद्र आव्हाड यांना मुंब्र्यात पाऊल ठेवू देणार नाही. त्यांचे नाव मी आजपासून झुठा जितेंद्र म्हणजेच जे.जे. असे ठेवतो. त्यांचे हे नाव शेवटपर्यंत जाईल, असेही यूनिस शेख म्हणाले. आव्हाड-शेख यांच्यातील संघर्षामुळे मुंब्रा परिसरात राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 5:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंब्र्यात राजकीय रणकंदन, मुलीचं तिकीट कापताच युनूस शेख आक्रमक, भर सभेत आव्हाडांना इशारा










