Mumbai News : मुंबईकरांच्या खिशावर पडणार भार, दक्षिण मुंबईत येणं महागणार, पाहा किती पैसे मोजावे लागणार?
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Travel Cost :मुंबईकरांचा प्रवास आणखी महागण्याची शक्यता वाढली आहे. मेट्रो प्रशासनाने बेस्टसोबतचा करार संपवून सिटीफ्लो आणि उबेरसोबत नवीन करार केला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशावर थेट परिणाम होणार असून नाराजीही वाढत आहे.
मुंबई : आता फक्त दोनशे रुपयात मुंबई फिरता येणार आहे, अशी बाहेरून ऐकायला आकर्षक वाटणारी घोषणा असली, तरी प्रत्यक्षात प्रवाशांच्या खिशावर मोठा ताण येणार आहे. कारण सध्या सगळीकडेच मुंबईत वाहतूक कोंडी वाढली असून शहरात मोठमोठ्या मेट्रो मार्गिका, ब्रिज आणि कॉरिडॉरची कामं जोरात सुरू आहेत. वाहतूक कोंडीचा भार कमी करण्यासाठी मेट्रो 3 सारखी भुयारी मेट्रो सेवा उभारण्यात आली. पण या प्रकल्पासाठी कोट्यवधींचा खर्च आणि प्रचंड विरोध पत्करल्यानंतरही, मेट्रो 3 चा प्रवास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं कठीण झालं आहे.
कफ परेडपर्यंत सेवा सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासीसंख्या साधारण दीड लाखांवर गेली असली, तरी ती नियोजित उद्दिष्टापेक्षा खूपच कमी आहे. काही भुयारी स्थानकांबाहेर रिक्षा, टॅक्सी किंवा बेस्ट बसची सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या या मेट्रोमधून बाहेर पडल्यावर, पुढचा प्रवास महागडा होणं ही प्रवाशांसमोरची मुख्य अडचण बनली आहे.
advertisement
बेस्टकडे दुर्लक्ष; खासगी कंपन्यांचे बाळसे वाढणार
मेट्रोने प्रवाशांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी बससेवेची गरज लक्षात घेतली. पण यासाठी मुंबईच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक बससेवेचा( बेस्टचा) विचार न करता थेट खासगी कंपनी 'सिटीफ्लो’शी करार केला. आता त्यात आणखी एक भर म्हणून, उबेर या खासगी टॅक्सी सेवेशीही करार करण्यात आला आहे.
यामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकाबाहेर पडताच, बेस्टसारखी परवडणारी पर्याय उपलब्ध न राहता महागड्या खासगी सेवांवर अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी, खासगी कंपन्यांचा व्यवसाय वाढेल, पण सर्वसामान्य मुंबईकरांच्या प्रवास खर्चात मोठी वाढ होणार आहे.
advertisement
असा महागतोय मुंबईकरांचा प्रवास
1)मेट्रो ३ चे तिकीट
– किमान : 10 रुपये
– कमाल : 70 रुपये
2)सिटीफ्लो बस
– किमान भाडे : ₹29
– मासिक पास : ₹499
3)उबेर टॅक्सी
– भाडे : अंतर + ट्रॅफिकवर आधारित (नेहमीच अधिक)
4)बेस्ट बस
– किमान भाडे : 10 ते 12 रुपये
उदाहरणार्थ, आरे ते CSMT असा 70 रुपये खर्च करून प्रवासी मेट्रोने आला आणि बाहेर पडल्यावर सिटीफ्लो बस पकडली तर त्याला किमान 29 रुपये मोजावे लागतील. ये-जा मिळून नोकरदाराचा खर्च सहजच 200रुपये च्या घरात जातो. याउलट भाईंदर–चर्चगेट लोकलचा मासिक पास फक्त 215 रुपये मध्ये मिळतो, हे चित्र विशेष लक्षवेधी आहे.
advertisement
महागाई, वाहतूक आणि नव्या प्रकल्पांनी मुंबई जाळ्यात गुंतली
view commentsमुंबईत सध्या जवळपास सर्वत्रच मेट्रो जाळे पसरले आहे. अनेक उड्डाणपूल, कनेक्टर आणि मेट्रो मार्गिका पूर्णत्वाकडे जात आहेत. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी कमी होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. पण तोपर्यंत, मेट्रो वापरणाऱ्या प्रवाशांना परवडणारी लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने मेट्रोकडे मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित करणे अवघडच ठरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 12:23 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईकरांच्या खिशावर पडणार भार, दक्षिण मुंबईत येणं महागणार, पाहा किती पैसे मोजावे लागणार?


