ICSE ISC Exam: दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, सुरुवात आणि शेवट कधी?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
ICSE ISC Exam: CISCE बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून सुमारे 2 लाख 60 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
पुणे: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ICSE (दहावी) आणि ISC (बारावी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार आयसीएसईची परीक्षा 17 फेब्रुवारी ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. ‘आयएससी'ची परीक्षा 12 फेब्रुवारी ते 6 एप्रिल दरम्यान होणार आहे.
यावर्षी आयसीएसईची परीक्षा सुमारे 2 लाख 60 हजारांहून अधिक, तर आयएससीची परीक्षा सुमारे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी देणार आहेत. आयसीएसईच्या 75 विषयांची आणि आयएससीच्या 50 विषयांची परीक्षा होणार आहे. सीआयएससीईचे मुख्य कार्यकारी आणि सचिव डॉ. जोसेफ इमॅन्युअल यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण होऊ नये आणि ते अधिक चांगली कामगिरी करू शकतील, यानुसार वेळापत्रक आखण्यात आले आहे.
advertisement
भारतासह विविध देशांमधील जवळपास 3,200 शाळा सीआयएससीईशी संलग्न आहेत. या शाळांमधून सुमारे 35 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच, या शाळांमधून जवळपास दीड लाख शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.
सीआयएससीईच्या परीक्षेचे वेळापत्रक
advertisement
आयसीएसई (दहावी) : 17 फेब्रुवारी ते 30 मार्च 2026
आयएससी (बारावी) : 12 फेब्रुवारी ते 6 एप्रिल 2026
सीआयएससीईच्या आयसीएसई आणि आयएससी या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 16, 2025 12:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
ICSE ISC Exam: दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, सुरुवात आणि शेवट कधी?







