Pune University : शिवाजी विद्यापीठाला पैकीच्या पैकी गुण, पुणे विद्यापीठ नापास, महाराष्ट्रात शेवटचा नंबर, पाहा काय घडलं?

Last Updated:

Pune University News : प्रशासकीय मूल्यांकनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची गुणवत्ता रसातळाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील 13 सार्वजनिक अकृषी विद्यापीठांपैकी एसपीपीयूला सर्वात शेवटचा क्रमांक मिळाल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शासकीय मूल्यांकनात पुणे विद्यापीठाचा क्रमांक घसरला..
शासकीय मूल्यांकनात पुणे विद्यापीठाचा क्रमांक घसरला..
पुणे : पुणे म्हटलं तर कायमच या शहराची ओळख विद्येचं माहेरघर म्हणून होते. पण आता याच पुण्याच्या शिक्षणासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, गोंडवाना विद्यापीठांनी एका मुल्यांकनात पैकीच्या पैकी गुण घेतले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मात्र नापास झाले आहे. नुकतचं सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत राज्यात मुल्यांकन झालं, यामध्ये पुणे विद्यापीठाला महाराष्ट्रात शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.
राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रशासकीय मूल्यांकन अहवालानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) राज्यातील 13 सार्वजनिक अकृषी विद्यापीठांमध्ये सर्वात शेवटच्या स्थानी आले आहे. सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या या मूल्यांकनात पुणे विद्यापीठाला 100 पैकी केवळ 42 गुण मिळाले असून, या निकालामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
या मूल्यांकनात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम, कर्मचाऱ्यांची अद्ययावत ज्येष्ठता सूची, सेवा पुस्तके अद्ययावत ठेवणे आणि ती डिजिटल करणे आदी महत्त्वाच्या निकषांचा समावेश होता. विशेष म्हणजे सेवा पुस्तके डिजिटल करणे या अत्यंत महत्त्वाच्या निकषात पुणे विद्यापीठाला अक्षरशः शून्य गुण मिळाले. याउलट मुंबई, कोल्हापूर, गोंडवाना आणि अमरावती विद्यापीठांनी याच विभागात 20 पैकी 20 गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.
advertisement
पहिला क्रमांक कोणाचा?
या क्रमवारीत गोंडवाना विद्यापीठ पहिल्या, मुंबई विद्यापीठ दुसऱ्या तर छत्रपती शिवाजी विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे विद्यापीठ मात्र तळाशी असल्याने शैक्षणिक गुणवत्तेनंतर आता प्रशासकीय गुणवत्ताही ढासळत असल्याचे संकेत मिळत आहेत. विद्यापीठाच्या वर्तुळात या घडामोडींवर मोठी चर्चा सुरू असून, हे मूल्यांकन ठरवून तर केले नाही ना? असा सवालही काही कर्मचारी आणि माजी पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
advertisement
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने या निष्कर्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. अधिकृत माहिती न घेता मूल्यांकन कसे केले गेले? खासगी संस्थेला सरकारी डेटा कसा मिळाला? असा सवाल विद्यापीठाने उपस्थित केला आहे. तसेच सेवा पुस्तके डिजिटल करण्याबाबत कोणताही आदेश प्राप्त झालेला नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या दोन्ही मूल्यांकनांमध्ये पुणे विद्यापीठ सतत तळाशी येत असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तुटवडा, प्रलंबित कामकाज आणि डिजिटल प्रक्रिया यांसारख्या मुद्द्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विद्यापीठ हे गांभीर्याने घेत सुधारणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune University : शिवाजी विद्यापीठाला पैकीच्या पैकी गुण, पुणे विद्यापीठ नापास, महाराष्ट्रात शेवटचा नंबर, पाहा काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement