2026 Grahan News: नवीन वर्ष 2026 मध्ये दोन सूर्यग्रहणं आणि दोन चंद्रग्रहणं; भारतात किती दिसणार, वेळ-काळ?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
2026 Grahan News: बघता-बघता वर्ष 2025 संपत आलं, जेमतेम दीड महिना उरलाय. त्यामुळं सर्वांना नवीन वर्षातील गोष्टींचे वेध लागले आहेत. नवीन वर्ष कसं असेल त्यामध्ये कोणत्या गोष्टी घडतील, कोणाला काय मिळेल, आर्थिक स्थिती कशी राहील याविषयी समजून घेण्यात अनेकांना रस असतो. नवीन वर्षातील काही गोष्टींमध्ये लोकांचा कॉमन इंटरेस्ट असतो. यापैकी एक म्हणजे नवीन वर्षात किती ग्रहणं होतील, ती कुठेकशी दिसतील. नवीन वर्षात 2025 प्रमाणेच एकूण 4 ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होतील.
ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार ग्रहणंही अशुभच मानली जातात, त्यामुळे या काळात काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक मानले जाते. म्हणजे ग्रहण काळात ठराविक वेळात अन्न खाऊ नये किंवा झोपू नये इ. ग्रहण काळात देवाचे नामस्मरण-मंत्र जप करण्याचा सल्ला दिला जातो. नवीन 2026 वर्षात ग्रहण केव्हा होणार, याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


