ऑफिसमध्ये मराठी तरुणीशी अश्लील भाषा, मनसेनं परप्रांतीय तरुणाला चोप चोप चोपलं, VIDEO व्हायरल!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
कामाच्या ठिकाणी एका मराठी महिलेला शिवीगाळ करत अश्लील भाषा वापरणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सहकार सेनेने आपल्या खास स्टाईलमध्ये धडा शिकवला आहे.
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी नवी मुंबई: कामाच्या ठिकाणी एका महिला सहकाऱ्याला पैशांसाठी शिवीगाळ करत अश्लील भाषा वापरणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सहकार सेनेने आपल्या खास स्टाईलमध्ये धडा शिकवला आहे. महाराष्ट्रात राहून मराठी महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांची मुजोरी अजिबात सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही मनसेनं यावेळी दिला.
संबंधित तरुणाने केवळ महिला सहकाऱ्याशीच गैरवर्तन केले नव्हते, तर त्याने कंपनीच्या मराठी मालकालाही अपशब्द वापरल्याची माहिती मिळाली होती. गैरवर्तनाची माहिती मिळताच मनसे सहकार सेनेचे बाळासाहेब शिंदे यांनी तातडीने सूत्रे हाती घेतली.
त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यालयात बोलावून घेतले. चौकशीदरम्यान, त्याने केलेल्या अक्षम्य वर्तनाबद्दल त्याला चोख सुनावण्यात आले. यावेळी कार्यालयातील दोन मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला चोप दिला. मनसे सहकार सेनेच्या कारवाईनंतर या तरुणाने गैरवर्तनासाठी मराठी महिलेची माफी मागितली. तसेच त्यांच्या वडिलांचा उर्वरित पगार त्यांच्याकडे सुपूर्द केला.
advertisement
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तरुणाकडून एक लिखित माफीनामाही घेण्यात आला. या माफीनाम्यात त्याने केलेल्या गैरवर्तनाबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला. तसेच, 'महाराष्ट्रामध्ये राहून यापुढे मराठी महिलांशी गैरवर्तन करणार नाही', अशा शब्दांत त्याला माफी मागायला लावली. तसेच 'महाराष्ट्रात अशा प्रकारची मुजोरी सहन केली जाणार नाही,' असा सज्जड दम दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं अशाप्रकारे परप्रांतीय तरुणाला चोप दिल्याने पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
November 16, 2025 12:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ऑफिसमध्ये मराठी तरुणीशी अश्लील भाषा, मनसेनं परप्रांतीय तरुणाला चोप चोप चोपलं, VIDEO व्हायरल!


