अक्षयच्या करिअरची सुरुवात कशी झाली?
न्यूज 18 मराठीसोबत आपल्या करिअरबद्दल बोलताना अक्षय केळकर म्हणाला," करिअरची सुरुवात म्हणजे मी आधी कला दिग्दर्शक म्हणून या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यावेळी बऱ्याच जणांनी मी अभिनेता होऊ शकतो, असं सुचवलं. चांगलं बोलता येतं, दिसायला चांगला असल्याने अभिनेता होण्याच्या संधी जास्त आहेत. त्यामुळे एकांकिका स्पर्धा करायला लागलो. नाटकात भाग घ्यायला लागलो. त्याचवेळी मग अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला".
advertisement
Salman Khan : सलमान गुंड प्रवृत्तीचा, मवाली आणि गुन्हेगार; दबंगच्या डायरेक्टचे भाईजानवर पुन्हा खळबळजनक आरोप
कलाकार म्हटल्यावर संघर्ष आलाच : अक्षय केळकर
अक्षय केळकर म्हणाला,"करिअरमधले संघर्ष आजही आहेत, उद्याही असतील. कलाकार म्हटल्यानंतर संघर्ष हा आलाच. तो कधी-कधी मोठा वाटतो कधी लहान वाटतो. संघर्ष कायम करावा लागणारे, याची नेहमी तयारी ठेवली पाहिजे. मग ते काम मिळायच्या आधी येतो, मिळाल्यावर येतो किंवा नंतर येतो. करिअरमध्ये वेगवेगळ्या पॉईंटला अडथळे आले आहेत. काम मिळाल्यानंतरही अडथळे येऊच शकतात. कधी व्यावसायिक, कधी मानसिक स्तरावचे हे अडथळे असतात. परिस्थितीनुसार या सगळ्या गोष्टींवर मात करायची असते".
अक्षय केळकरसाठी 'बिग बॉस मराठी' आणि 'ढोलकीच्या तालावर' होस्टिंग करतानाचा पहिला दिवस खास आहे.
स्ट्रगल हा प्रत्येकासाठी वेगळा असतो असं त्याचं म्हणनं आहे. अक्षयची आगामी 'काजळमाया' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. एक गोड रहस्य असणारी ही मालिका आहे. कंफर्ट झोनच्या बाहेरचं पात्र साकारायला अक्षयलाही आवडत आहे".