प्रियांक शर्मा सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. अभिनेत्याने वडिलांच्या अचानक झालेल्या निधनाचे कारण सांगितले नाही, तरी त्यांनी वडिलांचा एक फोटो आणि त्यासोबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही दु:खद बातमी समोर येताच इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली. कामिनी कौशल यांच्या पाठोपाठ इंडस्ट्रीतून आलेली ही अत्यंत दु:खद बातमी आहे. चाहते प्रियंका शर्माचं सांत्वन करताना दिसत आहेत.
advertisement
एक्स-गर्लफ्रेंडकडून शोक व्यक्त
प्रियंकने आपल्या वडिलांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे,"छान झोप घ्या माझे डॅडी… मी तुम्हाला खूप मिस करेन. आशा आहे की एक दिवस मी तुम्हाला अभिमान वाटेल असं काही करेन. शांततेत विसावा घ्या (1966 ते 2025)". प्रियंकच्या या पोस्टवर त्याला झालेले दु:ख स्पष्ट दिसत आहे. सेलिब्रिटी, नेटकरी आणि चाहते प्रियंकच्या पोस्टवर कमेंट करत शोक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे प्रियंकने आपल्या वडिलांची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच त्याची एक्स-गर्लफ्रेंड दिव्या अग्रवालनेही शोक व्यक्त केला आहे. दिव्या अग्रवालने कमेंट करत लिहिले,"स्वत:चा सांभाळ कर".
सेलिब्रिटींकडूनही शोक व्यक्त
दिव्या अग्रवालसह बॉलिवूड अभिनेता नील नितिन मुकेशने शोक व्यक्त करत लिहिलं आहे,"प्रियंक माय डियर..तुझ्या आणि कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे". शांतनु माहेश्वरीने लिहिलं आहे,"या वैयक्तिक लॉस साठी सॉरी भावा. स्वत:चा सांभाळ कर. ओम शांति".
प्रियांक शर्माची एक्स-गर्लफ्रेंड सध्या कुठे आहे?
प्रियंक आणि दिव्या अग्रवालशी यांची पहिली भेट ‘स्प्लिट्सविला 10’मध्ये झाली होती. या कार्यक्रमानंतर दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं. पण ‘बिग बॉस 11’मध्ये प्रियंक सहभागी झाला आणि त्यांचा ब्रेकअप झाला. प्रियंक 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याची इतर स्पर्धकांसोबतची जवळीच दिव्याला अस्वस्थ करणारी होती. अनेक अफवादेखील पसरल्या. त्यानंतर दिल्याने प्रियंकसोबत दुरावा निर्माण केला. दिव्या आता अपूर्व पडगांवकर सोबत लग्नबंधनात अडकली आहे. 20 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईत त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नानंतर दिव्या आपल्या पतीसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे.
