Health Tips: सकाळच्या चहाला आयुर्वेदिक पर्याय, रोज प्या वेलचीचे पाणी, फायदे पाहाल तर थक्क व्हाल

Last Updated:

Health Tips: अनेकांचा सकाळचा चहा सोडण्याचा प्लॅन असतो. परंतु, पर्यायी काहीतर हवं असतं. तेव्हा सकाळी वेलचीचे पाणी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी ठरू शकतं.

+
Health

Health Tips: सकाळच्या चहाला आयुर्वेदिक पर्याय, रोज सकाळी घ्या वेलचीचे पाणी, फायदे पाहाल तर थक्क व्हाल

अमरावती: आपल्या घरातील किचनमध्ये नेहमी सुगंध देणारी वेलची सगळ्यांनाच आवडते. पण, एखाद्या गोड पदार्थामध्ये किंवा चहात घालूनच ती आहारात घेतली जाते. तशी स्पेशल वेलची फार कमी खातात. पण, दररोज वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत. दररोज सकाळी वेलचीचे पाणी पिल्यास शरीरात अनेक बदल होतात. दररोज सकाळी वेलचीचे पाणी पिल्यास होणाऱ्या फायद्यांबाबत जाणून घेऊ.
वेलचीच्या पाण्याचे फायदे
  1. सकाळी रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी घेतल्याने पोट हलके राहते. गॅस आणि ऍसिडिटी कमी होते. तसेच पचन देखील सुधारण्यास मदत करते.
  2. वेलची मेटाबॉलिझम वाढवते. शरीरातील अनावश्यक पाण्याचे प्रमाण कमी करून वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
  3. उष्णतेमुळे तोंडात अल्सर होत असतील तर वेलचीचे पाणी प्रभावी ठरते. यातील थंड व अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म तोंडातील जळजळ कमी करून अल्सर लवकर बरे होण्यास मदत करतात.
  4. वेलचीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असून शरीरातील सूज, यीस्ट आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यास मदत होते. नियमित सेवन केल्यास व्हाईट डिस्चार्जचे प्रमाण नियंत्रित होण्यासही मदत होते.
  5. अतिउष्णता, पित्त वाढणे किंवा पोषणातील कमतरता यामुळे केस गळतात. वेलचीचे पाणी शरीर थंड ठेवते, रक्तातील विषारी द्रव्ये कमी करते आणि रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केसांच्या मुळांवर सकारात्मक परिणाम होऊन केस गळती कमी होण्यास मदत होते.
  6. वेलचीतील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात. त्वचेवरील सूज, पिंपल्स व निस्तेजपणा कमी होतो.
advertisement
वेलचीचं पाणी कसं बनवायचं?
कफ कमी करण्याची क्षमता असल्याने वेलचीचे पाणी सर्दी, खोकला, घश्यातील खवखव यावरही उपयोगी ठरते. दररोज रात्री वेलचीचे 2 दाणे 1 कप पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्या नंतर ते पाणी थोडं कोमट करून पिऊ शकता.
वेलचीचे पाणी पिण्यास सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला देखील घेणे महत्वाचे आहे. कारण, प्रत्येक व्यक्तीचे शरीर हे वेगळे असते. कोणाला कशाची ॲलर्जी आहे का? तसेच त्यामुळे काही साईड इफेक्ट होईल का? हे जाणून घेणे गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: सकाळच्या चहाला आयुर्वेदिक पर्याय, रोज प्या वेलचीचे पाणी, फायदे पाहाल तर थक्क व्हाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement