पहिल्या आठवड्यात एकमेकांवर प्रेम व्यक्त करणाऱ्या अरबाज आणि निक्की यांच्यात दुसऱ्याच आठवड्यात वादाची ठिणगी पडली आहे. निक्की-अरबाज यांच्यात जोरदार भांडणं वाजल्याचं पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निक्की-अरबाज यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
( 'माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही' जान्हवी किल्लेकर आणि गोलीगत सूरजमध्ये जुंपली )
लेटेस्ट प्रोमो समोर आला आहे ज्यात निक्की आणि अरबाज एका विषयावर बोलत आहे. "आपण त्यांच्यावर अटँक केला आहे", असं निक्की सांगत असते. त्यावर अरबाज तिला म्हणतो, "तुम्ही इतके नाजूक असाल तर घरी बसा. तू त्याची साइड घेऊ नको. घ्यायची तर त्याची पूर्ण साइड घे". त्यावर निक्की म्हणते, "मी त्याची साइड घेत नाहीये. माझ्यासमोर तू असा एटिट्यूट दाखवू नकोस". त्यावर अरबाज म्हणतो, "तू ही मला एटिट्यूट दाखवू नकोस" आणि तिथून निघून जातो. त्यावर निक्की त्याला म्हणते, "मी इथेच उभी आहे. तू मला एटिट्यूड दाखवून निघून जात आहेस".
advertisement
निक्की आणि अरबाज यांची ही भांडणं पाहून नेटकऱ्यांनी मात्र त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. एका युझरनं लिहिलंय, "ये तो होना ही था". दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "आता निक्की आणि अरबाज एकमेकांच्या विरोधात जाणार लवकरच". तर आणखी एका युझरनं लिहिलंय, "ती निक्की कोणाची नाहीये....नका रे तिच्या वर विश्वास ठेऊ".
निक्कीनं विकेंडला रितेशभाऊच्या धक्क्यावर अरबाजची बाजू घेतली. "अरबाज माझा मित्र आहे आणि त्याच्यासाठी माझा नेहमी सॉफ्ट कॉर्नर असेल", असं सांगितलं. त्यावर रितेशनं तिला म्हटलं, "बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात झालेल्या जोड्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंतही टिकत नाही".