'माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही' जान्हवी किल्लेकर आणि गोलीगत सूरजमध्ये जुंपली

Last Updated:

बिग बॉस मराठी 5 सुरु होऊन आठवडा झाला. आठवडाभरात जे काही घडलं त्यावर विकेंडला रितेश भाऊंचा धक्काही झाला. यामध्ये सगळ्याच स्पर्धकांना त्यांच्या चुका दाखवून त्यांचा क्लास घेतला.

जान्हवी किल्लेकर आणि गोलीगत सूरजमध्ये जुंपली
जान्हवी किल्लेकर आणि गोलीगत सूरजमध्ये जुंपली
मुंबई : बिग बॉस मराठी 5 सुरु होऊन आठवडा झाला. आठवडाभरात जे काही घडलं त्यावर विकेंडला रितेश भाऊंचा धक्काही झाला. यामध्ये सगळ्याच स्पर्धकांना त्यांच्या चुका दाखवून त्यांचा क्लास घेतला. यासोबत एक एलिमिनेशनही झालं. बिग बॉस मराठीच्या घरामधून पहिल्याच आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर पडले आहेत. 'राम कृष्ण हरी' म्हणत त्यांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. आता आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. सिझनचा नववा दिवस. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जान्हवी आणि सूरजचा गोलीगत झगडा होणार आहे. याचा नवा प्रोमोही समोर आलाय.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील दुसऱ्या आठवड्याचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर आणि गोलीगत सूरज चव्हाण भांडताना दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये जान्हवी म्हणतेय,"तुला काल काय चावी मिळाली का? आठवडाभर तर शांतच होतास ना. माझ्यासमोर शहानपणा करायचा नाही". त्यावर गोलीगत सूरज जान्हवीला म्हणतो,"तू निघ... चल फूट".
advertisement
गोलीगत सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता. पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवताना दिसून येईल. 'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यामुळे या आठवड्यात हे सदस्य कसा खेळ खेळणार? खेळ खेळताना एकमेकांसोबत कसे वागणार हे पाहावे लागेल.
advertisement
दरम्यान, घरात 16 स्पर्धकांची एण्ट्री झाली होती आता यातील 15 सदस्य उरले आहेत. त्यामुळे या बिग बॉसच्या रेसमध्ये कोण लंबी रेसचा घोडा ठरेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही' जान्हवी किल्लेकर आणि गोलीगत सूरजमध्ये जुंपली
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement