Mira Jagannath : 'इथे कोणीही मान अपमानाची अपेक्षा ठेवू नये' मिरा जगन्नाथची पोस्ट व्हायरल!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये झालेल्या वादात अभिनेत्री मिरा जगन्नाथने उडी घेतलीय. मिराने या वादामध्ये निक्की तांबोळीला सपोर्ट केल्याचं पहायला मिळतंय. मिराने शेअर केलेली पोस्ट लोकांचं लक्ष वेधून घेतेय.
मुंबई : बिग बॉस मराठी 5 सीझन सुरु झाल्यापासून सोशल मीडियावरही त्याचीच चर्चा पहायला मिळत आहे. नवा सीझन सुरु होताच पहिल्याच आठवड्यात स्पर्धकही वाद-विवाद करताना दिसत आहे. स्पर्धकांच्या वागण्यावर आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी प्रतिक्रियाही दिली आहे. अशातच निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये झालेल्या वादात अभिनेत्री मिरा जगन्नाथने उडी घेतलीय. मिराने या वादामध्ये निक्की तांबोळीला सपोर्ट केल्याचं पहायला मिळतंय. मिराने शेअर केलेली पोस्ट लोकांचं लक्ष वेधून घेतेय.
निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकरच्या भांडणात निक्कीने ज्या प्रकारे वर्षाताईंना बोललं ते चुकीचं असल्याचं सगळेजण बोलत आहेत. वयाचा मान ठेवून बोलायचं तर तू उद्धटपणे बोललीस, असं बोललं गेलं. मात्र मिरा जगन्नाथने याविषयी वेगळं मत मांडलं. तिनं 'तुमचं वय घरी ठेवून या' म्हणत पोस्ट शेअर केली. मिरा जगन्नाथ नेमकं काय म्हणाली?
advertisement
मिराने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत बिग बॉस मराठी 5 च्या भांडणावर मत व्यक्त केलं. खास करुन निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यावर. मिरा म्हणाली, 'इथे कोणीही मान अपमानाची अपेक्षा ठेवू नये. बिग बॉसच्या घरात कोणीही मोठा कलाकार किंवा छोटा कलाकार नसतो. आणि तुमचं वय घरी ठेवून या.'
advertisement
पोस्टच्या शेवटी मीराने असंही लिहिलं की, 'हे माझं मत आहे ज्यांना पटत नसेल त्यांनी मला मेसेज करु नये.' मीराच्या स्टोरीचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, यंदाचा सीझन नव्या होस्टसह नव्या फॉरमॅटमध्ये आहे. घरात वेगवेगळ्या कॅटेगरीतले स्पर्धक आले आहेत. सर्वच एकापेक्षा एक वरचढ आहे. विकेंड असल्यामुळे रितेश देशमुख स्पर्धकांनी भाऊचा धक्का देत आठवड्याभरात झालेल्या गोष्टींवरुन क्लास घेत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2024 10:27 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mira Jagannath : 'इथे कोणीही मान अपमानाची अपेक्षा ठेवू नये' मिरा जगन्नाथची पोस्ट व्हायरल!